sharad-pawar-ajmer dargah
sharad-pawar-ajmer dargah 
नवी मुंबई

शरद पवार यांच्या वतीने अजमेर दर्ग्यावर चादर

महेश जगताप

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावतीने अजमेर येथील दर्ग्यावर चादर चढविण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी ही चादर चढविली.  शरद पवार यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील सरकार  जास्तीत जास्त लोककल्याणकारी योजना राबवून महाराष्ट्रातील नागरिक सुखी होवो, अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली.

अजमेर येथे २९ तारखेपासून ऊरूस सुरू होत आहे. हा उरूस संपूर्ण भारताच लक्ष वेधून घेत असतो. पवार यांनी स्वतः ही चादर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत सुपूर्त केली होती. या वेळी फमीदा खान, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष सुहेल सुभेदार ,नजीब मुल्ला ,हसन खान व इतर मान्यवर उपस्थित होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT