Ganesh Naik Sarkarnama
नवी मुंबई

ठाण्यात भाजप आमदाराने सत्ताधाऱ्यांना दाखवला ईडीचा धाक

"ज्या पद्धतीने भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी यंत्रणा काम करत आहे, तुम्ही त्या टोपलीमध्ये जाणार नाही याची दक्षता घा,"

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाविकास आघाडी नेत्यांना भाजपकडून ईडीचा (ed) धाक दाखविला जात आहे, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अशाच एक प्रकार ठाणे महापालिकेत नुकताच घडला. भाजपच्या (bjp) आमदाराने प्रकल्प रद्द करण्यासाठी सत्ताधारी नेते, व ठाणे महापालिका आयुक्तांना अप्रत्यक्षपणे धाक दाखविल्याची चर्चा आहे.

नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या अरेंजा कॉर्नर ते कोपरी उड्डाणपूल, कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकाच सुशोभीकरण हे तीनही प्रकल्प रद्द करा, अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik)यांनी दिला आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांची नाईक यांनी भेट घेतली.

सत्ताधाऱ्यांना देखील नाईकांनी इशारा दिला आहे. "निवडणुकीसाठी फंड जमा करण्यासाठी चालू असलेली ही नाटकं बंद करा, अन्यथा ज्या पद्धतीने भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी यंत्रणा काम करत आहे, तुम्ही त्या टोपलीमध्ये जाणार नाही याची दक्षता घा," अशी प्रतिक्रिया नाईकांनी व्यक्त केलेय. एकूणच भाजप आमदार गणेश नाईक यांनी ठाण्यातील नेत्यांना अप्रत्यक्ष ईडी चाच धाक दाखविल्यामुळे ईडी चा पुढचा टार्गेट कोण या चर्चेला उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT