पिंपरी चिंचवड

`जय शिवराय, जय महाराष्ट्र` म्हणत अमोल कोल्हेंनी घेतली खासदारकीची थपथ

डी. के. वळसे पाटील

मंचर : संसदेत शिरुर लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांनी मराठीत शपथ घेऊन शेवटी `जय शिवराय, जय महाराष्ट्र` असे म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.`जय भवानी, जय शिवाजी` अशा घोषणाही सभागृहात दुमदुमल्या.  साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतली आणि ती झाल्यानंतर त्यांनीही जय शिवराय, अशी घोषणा दिली.

१७ व्या लोकसभेच्या कामकाजास सुरुवात शपथ विधी सोहळ्याने सुरुवात झाली.  स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहचलेले डॉ. कोल्हे आज संसदेत नक्की काय बोलणार आणि कोणत्या भाषेत शपथ घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. शिरुर लोकसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने विविध माध्यमांच्या वाहिन्यांमध्ये खासदारांचा शपथविधी पाहण्यासाठी आतुर होते. ५ वाजून ३३ मिनिटांनी शपथविधीस सुरुवात झाली. मराठीमधूनच खासदार डॉ. कोल्हे यांनी शपथ घेतली.    

याबाबत `सरकारनामा`शी बोलताना डॉ. कोल्हे म्हणाले, "संसदेत जय शिवराय हे नाव उच्चारून महाराष्ट्र व शिवप्रेमी जनतेच्या भावनेचा आदर करण्याची संधी माझ्या सारख्याला मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो.``


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT