Eknath Pawar Bjp News Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Eknath Pawar BJP News : महेश लांडगेंना वैतागूनच भाजप प्रदेशचे नेते एकनाथ पवारांनी पक्षाला ठोकला राम राम!

Eknath Pawar BJP News : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणामध्ये पवार यांना डावल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा...

Chetan Zadpe

Pimpri Chinchwad News : भारतीय जनता पक्षातील पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक पातळीवरील नेत्यांचे राजकारण, जुने आणि नव्यांचा वाद आणि भोसरी विधानसभेत संधी उपलब्ध नसल्याने भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार यांनी राजीनामा दिला. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या राजकीय कुरघोडीला कंटाळून एकनाथ पवार यांनी राम राम ठोकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Latest Marathi News)

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते एकनाथ पवार यांनी तीन दिवसांपूर्वी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसलेला आहे. मराठा समाजासाठी जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले. त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सगळ्या पदाचा राजीनामा देत आहे, अशी भूमिका पवार यांनी जाहीर केली होती. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणामध्ये पवार यांना डावल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. एकनाथ पवार यांच्याशी संवाद साधण्याचा 'सरकारनामा'ने प्रयत्न केला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

योगदान दिले, पण

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्यामध्ये एकनाथ पवार यांचे योगदान मोठे आहे. टाटा मोटर्समधील कामगार नेते म्हणून त्यांनी कामगार चळवळीत योगदान दिले. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले. शहराध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख, पक्षप्रवक्ते अशी विविध पदे भूषविली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ते अत्यंत जवळचे सहकारी आहेत.

२०१२ मध्ये भाजप शहराध्यक्ष म्हणून काम केले. त्याचबरोबर २०१४ च्या भोसरी विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली होती. त्यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांनी पिंपरीमध्ये सभा घेतली होती. मात्र भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष अशी लढत झाल्याने अगदी थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता.

स्थानिक नेत्यांच्या राजकारणात फटका

भोसरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर २०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये पूर्णनगर, संभाजी नगर प्रभागातून निवडून आले होते. त्यानंतर तीन वर्षे पक्षाचे महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते म्हणून त्यांनी भूमिका बजावली. मात्र, स्थायी समिती सभापती म्हणून त्यांना डावलले गेले.

आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील स्थानिक राजकारणाचा फटका एकनाथ पवार यांना बसला, असे असतानाही त्यांनी आपल्या प्रभागामध्ये नव्हे, तर शहर परिसरामध्ये पक्षनेता म्हणून काम करत असताना मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली.

भोसरीत संधी उपलब्ध नसल्याने!

भारतीय जनता पक्षातील निष्ठावान आणि ज्येष्ठ सहकाऱ्यांमधील ज्येष्ठ नेते म्हणून एकनाथ पवार यांचं योगदान आहे. भाजपतील अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना बसला. भोसरी विधानसभेमध्ये विद्यमान आमदार महेश लांडगे असल्याने आगामी काळात संधी नसल्याने गेल्या काही वर्षांपासून ते नांदेड मधील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघामधून संघटना बांधण्याचे काम करत होते. त्या मतदारसंघांमध्ये शिवसेनेची अर्थात उद्धव ठाकरे आणि मतदार आहेत. त्यामुळे एकनाथ पवार यांनी शिवसेनेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

त्याचबरोबर भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे आहेत. या मतदारसंघातून २०१४ मध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते एकनाथ पवार यांना पडली होती. विधानसभेतून पवार यांना संधी नव्हती, त्याचबरोबर महापौर स्थायी समिती अध्यक्षपद निवडीत त्यांना डावलले गेले होते, शेवटचे स्थायी समिती अध्यक्षपद पवार यांना मिळणार होते. मात्र, स्थानिक नेत्यांच्या गटबाजीचा फटका त्यांना बसला. निष्ठावान असूनही ते कायम डावलले गेले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT