Laxman Jagtap
Laxman Jagtap Sarkarnama
पिंपरी चिंचवड

लक्ष्मणभाऊंच्या भेटीला भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

सरकारनांमा ब्यूरो

पिंपरीः आजारातून आता स्थिरसावर झालेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांना भेटण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी (ता.७) आले होते. यावेळी त्यांनी लक्ष्मण जगताप यांना पक्षासाठी सक्रीयपणे कार्यरत राहणायासाठी शुभेच्छा दिल्या.

लक्ष्मण जगताप मागील काही दिवसांपासून आजाराने ग्रस्त आहे. त्यांची प्रकृती आता सुधारत आहे. १० जून रोजी झालेल्या राज्यसभा आणि २० जून रोजी झालेल्या विधानपरिषद निवडणूकीत आमदार लक्ष्मण जगताप यांनी आजाराने ग्रस्त असतानाही त्यांनी मतदानाला हजेरी लावली होती. त्यांच्यासोबत आमदार मुक्ता टिळक यांनीही आजार असतानाही मतदान केले होते. हवाई रूग्णवाहीकेने त्यांना मतदानासाठी आणण्यात आले होते. या निवडणूकीतील विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीसांनी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना दिले होते. त्यांच्या पक्षनिष्ठेचे कौतुक ही फडणवीसांनी केले होते. आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेऊन, त्यांना पक्षासाठी सक्रीयपणे कार्यरत राहणायासाठी शुभेच्छा दिल्या.

दरम्यान लक्ष्मण जगताप आता आजारातून बरे झाले आहेत. पक्षासाठी आता ते सक्रीयपणे सहभागी होतील, अशी माहीती मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT