Devendra Fadanavis Comment about Ajit Pawar Returning Back
Devendra Fadanavis Comment about Ajit Pawar Returning Back 
पिंपरी चिंचवड

अजितदादा परत का गेले हे त्यांनाच माहित : देवेंद्र फडणवीस

सरकारनामा ब्युरो

पि: राज्यात सरकार स्थापनेसाठी जलसिंचन घोटाळ्यातून 'क्लीनचीट' देण्यासारखे कुठलेही 'डिल' अजित पवारांशी केले नव्हते. तसेच त्यासाठी त्यांना जबरदस्तीही करण्यात आली नव्हती,असे राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

दरम्यान, एसीबीच्या (राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) विभागीय अधिक्षकांनी अजित पवारांना दिलेली क्लीनचिट मुंबई उच्च न्यायालयात टिकणार नाही, कारण ती त्याअगोदर एसीबीचे प्रमुख असलेल्या डीजीपींनी (महासंचालक) दिलेल्या प्रतिज्ञापत्राच्या विरोधात आहे,असेही फडणवीस यांनी सांगितले. तसेच क्लीनचीट देणारे प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्रीपदावरून मी पायउतार झाल्यानंतर न्यायालयात सादर केल्याचे सांगत त्याच्याशी आपल्या सरकारचा काहीही सबंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

अजित पवारांशी डील करून त्यांना सत्तास्थापनेसाठी जबदरस्ती केल्याच्या विचारलेल्या प्रश्नावर त्यांना कोणी फसवू शकते का? त्यांना कोणी फरफटत नेऊ शकते का? अशी उलट विचारणा फडणवीसांनीच केली. आमचा तो गनिमी कावा होता.पण,तो फसला, हे मात्र त्यांनी मान्य  केले. कधी कधी राजकारणात सर्जीकल स्ट्राईक करावा लागतो. काळ ठरवेल,आमचा हा निर्णय चूक होता,की कसे असे सांगत तो चुकीचाही ठरू शकतो,अशी भविष्यवाणी त्यांनी केली. 

स्थिर सरकार देण्याच्या हेतूने अजितदादा आमच्याकडे आले होते. पण, ते परत का गेले व त्यांनी राजीनामा का दिला, हे तेच सांगू शकतील, असे ते सावधपणे म्हणाले. त्याचवेळी 'बिहाइंड द सीन अॅन्ड बिटवीन द लाइन्स' काही कथानक आहे.ते योग्यवेळी बाहेर येईल, असे सांगत त्यांनी राज्याच्या सत्ताबदलातला सस्पेन्स कायम ठेवला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT