Pimpri-Chinchwad News Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Politcal News : माजी भाजप नगरसेविकेच्या पतीची महापालिका अधिकाऱ्याला धमकी

Uttam Kute

Bjp Politcal News : भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे (Mahesh landge) यांच्या कट्टर समर्थक आणि त्यांच्या मतदारसंघातील मोशीतील माजी नगरसेविका सारिका सस्ते-बोराडे यांचे पती नितीन बोऱ्हाडे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आवारात १८ ऑक्टोबरला बिल्डर नरेश पटेल यांना कानफटात लगवली होती. त्यावेळी नरेश पटेलांसह संपूर्ण पटेल समाजाची आमदार लाडगेंनी माफी मागितली होती. त्यानंतर दीड महिन्यातच भोसरीतील सारिका लांडगे या भाजपच्या आणखी एका माजी नगरसेविकेचा पती संतोष लांडगे याने, तर पालिका कार्यालयात घुसून सहाय्यक आरोग्य अधिकारी राजेश भाट यांना शिवीगाळ करीत धमकी दिली, तर त्यांच्या साथीदाराने भाट यांच्या थोबाडीत मारली.

योगायोगाने दोन्ही घटनांत नाव आलेल्या माजी भाजप (bjp) नगरसेविकांची नावे सारिका आहेत. दोघीही गत टर्मला म्हणजे २०१७ भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभागातून निवडून आल्या होत्या. कालच्या घटनेत सारिका लांडगे यांच्या पतीसह शंकर मुरलीधर सोनवणे (वय ३२) हा पालिकेचा सफाई कामगार आणि एक अनोळखी अशा तिघांविरुद्ध भोसरी पोलिस ठाण्यात जीवे ठार मारण्याची धमकी देणे, शिवीगाळ आणि मारहाण करणे यासह सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी २४ तास उलटल्यानंतरही अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही. या घटनेत थोबाडीत मारलेल्या आरोपीची प्रथम ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे भोसरी पोलिस ठाण्याचे सिनिअर पीआय शिवाजी गवारे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत महापालिकेच्या ई क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी राजेश नंदलाल भाट ( रा. थेरगाव ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या प्रभाग कार्यालयात सोनवणे हा चतृर्थ श्रेणी कामगार आहे. गैरहजेरी आणि उद्धट वर्तनाबद्दल त्याला नोटीस देण्यात आली होती. त्याचा राग मनात धरून तो काल लांडगे व आणखी एकाला पांजरपोळ, भोसरी येथील इ प्रभाग कार्यालयात घेऊन आला. तेथे त्यांनी भाट यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यासोबतच ते त्यांना ओढून नेऊ लागले. त्यावेळी सोनवणे याने, तर मी तुमच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करतो, अशी धमकी दिली.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT