Shivajirao Adhalravada Patil sarkarnama
पिंपरी चिंचवड

शिरूरचे माजी खासदार आढळरावही झाले कोरोना पॉझीटीव्ह

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लोकप्रतिनिधींसह पुढाऱ्यांना मोठ्या संख्येने कोरोना होत आहे.

सरकारनामा ब्युरो

पिंपरीः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत राजकारण्यांना मोठ्या संख्येने कोरोनाचा प्रार्दूभाव होत आहे. राज्य मंत्रीमंडळातील दहा मंत्री व सत्तरहून अधिक आमदारांना आतापर्यंत कोरोना झाला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील `दादां `नाही त्याने सोडलेले नाही.

`शिरूर`मधील भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) हे दुसऱ्या टप्यात कोरोना पॉझीटीव्ह झाले. त्यानंतर आता शिरूरचे माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळरावदादा-पाटील (Shivajirao Adhalravada Patil) यांना शनिवारी (ता. ८) कोरोनाने गाठले. तर, शिरूरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हेही काही दिवसांपूर्वी कोरोनातून बरे झाले आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लोकप्रतिनिधींसह पुढाऱ्यांना मोठ्या संख्येने कोरोना होत आहे. नुकत्याच झालेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही अनेकांना कोरोना झाला होता.तर, शिरूरमधील भोसरीच्या आमदार दादानंतर आता लाडेवाडीच्या (ता. आंबेगाव) माजी खासदार दादांनाही कोरोनाने शनिवारी गाठले. त्यामुळे खासदार नसूनही त्यांनी दर रविवारी सुरु ठेवलेला लांडेवाडीतील त्यांचा रविवारचा (ता.९) जनता दरबार रद्द करण्यात आला आहे.

पुढील आठवड्यातही तो होईल,की नाही,याविषयी शंका आहे. कोरोना झाल्याची माहिती आढळराव यांनी ट्विट करून दिली. आपली प्रकृती ठीक असल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्यानुसार विश्रांती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते नुकतेच तिरुपतीहून बालाजीचे दर्शन घेऊन परतले. त्यानंतर त्यांना थोडा थकवा जाणवत होता. म्हणून त्यांनी कोरोना चाचणी केली असता ती सकारात्मक आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT