Pimpri Chinchwad News Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad News : गृहमंत्री फडणवीसांमुळे 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस,पोलिसांवर गंभीर आरोप...

Devendra Fadnavis : वारंवार तक्रारी करूनही पोलिसांकडून दखल न घेतल्याचा आरोप...

सरकारनामा ब्यूरो

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad : मागील काही दिवसांपासून देशासह राज्यात अनेक ठिकाणी धर्मांतर, 'लव्ह जिहाद'च्या धक्कादायक घटना समोर येत आहे. हिंदुत्ववादी संघटना या घटनांविरोधात आक्रमक झाल्या असून विविध ठिकाणी मोठ्या संख्येनं मोर्चे देखील काढण्यात आले आहेत. तसेच 'द केरला स्टोरी' हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर 'लव्ह जिहाद'च्या घटना पुढं येण्याचं प्रमाण वाढलं आहे. याचवेळी मुंबई, नगर आणि पुणे जिल्ह्यातील मंचर (ता.आंबेगाव) येथील `लव्ह जिहाद`चं लोण आता पिंपरी-चिंचवडपर्यंत पोहचलं आहे.

पिंपरी-चिंचवडच्या घटनेतील २२ वर्षीय हिंदू मुलीचा पिता आपल्याला न्याय मिळावा. यासाठी गेली तीन वर्षे धडपड करीत होता. परंतू,त्याची दखल पोलिसांनी घेतली नाही. अखेरीस या पित्यानं नुकतेच पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येऊन गेलेल्या उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन त्यांच्याकडेच या घटनेची फाईल सुपूर्द केली आहे. त्यानंतर त्यांनी त्यात जातीनं लक्ष घातलं. पोलीस आयुक्तांनाच कारवाई करण्यास सांगितले. त्यानंतर चक्रे वेगाने फिरली अन तीन वर्षानंतर अखेर काल याप्रकरणी शहरातील चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

मेहबूब लियाकत अली शेख, पाशा शेख,जिशान पाशा शेख,इम्रान पाशा शेख आणि अमीर पाशा शेख अशी आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र,त्यांनी अटकपूर्व जामीन घेतला असल्याने त्यांना अटक करता आली नसल्याचे तपासाधिकारी आणि पीएसआय राहूल वरकटे यांनी `सरकारनामा`ला सांगितले.

मात्र,तोपर्यंत वरिष्ठ पोलीस(Police) निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दखलच घेतली नाही,मदत केली नाही. उलट आरोपींना मदतच केली. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला असा खळबळजनक आरोप या गुन्ह्यातील फिर्यादीने 'सरकारनामा'शी बोलताना गुरुवारी (दि.८) केला. हे लव्ह जिहादचंच प्रकरण असल्याचं त्यांनी ठासून सांगितलं. दरम्यान, खराडे यांची बाजू ऐकण्य़ासाठी संपर्क केला असता तो झाला नाही.

ही घटना २० जून २०२० रोजी घडली. तेव्हा या लव्ह जिहाद घटनेतील फिर्यादींची हिंदू मुलगी १९ वर्षाची,तर मुस्लिम मुलगा अमीर पाशा शेख हा १८ वर्षाचा होता.म्हणजे त्याचे लग्नाचे वय (२१) नव्हते. म्हणून तो सज्ञान असल्याची बोगस कागदपत्रे (पॅनकार्ड,आधारकार्ड)त्याच्या नातेवाईकांनी बनवली आणि त्याचे या हिंदू मुलीशी लग्न लावून दिले होते.खोटा निकाहनामा तयार केला.

पोलिसांकडून दखल न घेतल्याचा आरोप...

'लव्ह जिहाद'(Love Jihad) चा कायदा नसल्याने चिंचवड पोलिसांनी फसवणूक व बनावटगिरीचा गुन्हा लव्ह जिहादच्या या प्रकरणात दाखल केला आहे. तीन वर्षापूर्वी याच महिन्यात वीस तारखेला ही घटना घडली होती. पण, वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल पोलिसांनी घेतलीच नव्हती. फडणवीसांनी त्यात लक्ष घातल्याने तीन वर्षानंतर काल त्याबाबत गुन्हा दाखल झाला.मात्र,या घटनेतील मुलगी अद्याप मिळून आलेली नाही,असे तिच्या वडिलांनी म्हणजे या गुन्ह्यातील फिर्यादींनी सांगितले.

नगरमधील अशा प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बुधवारी( दि.७) च भेट देऊन 'लव्ह जिहाद'चा कायदा करण्याची मागणी केली आहे. तर, त्याअगोदर काही दिवस (२६ मे) याच पक्षाचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी मंचर येथील 'लव्ह जिहाद'ला बळी पडलेल्या हिंदू मुलीसह पत्रकार परिषदच घेतली होती. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये तसाच प्रकार घडल्याने भाजपकडून त्याचे भांडवल केले जाण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT