Dr. Amol Kolhe, Shivajirao Adhalrao Patil sarkarnama
पिंपरी चिंचवड

Shirur Loksabha News : शिरूरला आढळराव फायनल; २०१९ ची पुनरावृत्ती होणार?

Uttam Kute

Pimpari News : शरद पवार आणि अजित पवार म्हणजे युती आणि आघाडीने प्रतिष्ठेच्या केलेल्या शिरूर (जि. पुणे) लोकसभेत युतीचे उमेदवार म्हणून शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे नाव फायनल झाले आहे. त्यांच्या नावाची घोषणा आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे.

शिरूरला आपणच महायुतीचे उमेदवार असणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करीत तयारीला लागण्यास काल (ता. १७) सांगितल्याचे आढळरावांनी आज (ता.१८) 'सरकारनामा'ला सांगितले. माझ्यादृष्टीने पक्ष महत्त्वाचा नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीचेही ते उमेदवार असू शकतात, असेच सूचित केले.

लांडेवाडी, मंचर (ता. आंबेगाव) येथील आपल्या निवासस्थानातील रविवारचा जनता दरबार रद्द करून ते काल तातडीने मुख्यमंत्र्यांना भेटण्यास मुंबईला गेले होते, तर कालच याप्रश्नी अजित पवार यांनीही शिरूर लोकसभा मतदारसंघातील आपल्या आमदारांची बैठक मुंबईत बोलावली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आढळराव आणि कोल्हे पुन्हा भिडणार

शिरूरमधून आघाडीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे Amo Kolhe यांची उमेदवारी शरद पवार यांनी अगोदरच जाहीर केली आहे, तर आता आढळरावांचेही नक्की झाल्याने पुन्हा या दोघांतच लढाई होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. २०१९ ला कोल्हेंनी आढळरावांचा खासदारकीचा चौकार चुकवला. त्याचे उट्टे काढण्याची संधी त्यांना या वेळी मिळाली आहे, तर कोल्हेंचा पराभव करून अजित पवार यांना आपली प्रतिष्ठाही कायम ठेवायची आहे.

आढळराव राष्ट्रवादीकडून लढणार

युतीत शिवसेनेच्या वाट्याच्या शिरूरवर अजित पवारांनी दावा केला. त्यांनी कोल्हेंचा पराभव करण्याची घोषणा केली. मात्र, कोल्हेंविरुद्ध सक्षम उमेदवारच त्यांच्याकडे नसल्याने त्यांना तो आयात करावा लागतो आहे. त्यातून आढळरावांना ते राष्ट्रवादीकडून उभे करणार आहेत. मात्र,आढळरावांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यास त्यांचे वीस वर्षांपासूनचे कट्टर राजकीय वैरी आणि पक्षाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचा कडाडून विरोध आहे. त्यांची अजितदादांना समजूत घालावी लागणार आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT