Eknath Shinde Vs Uddhav Thackeray  sarkarnama
पिंपरी चिंचवड

Thackeray Vs Shinde: शंभर कोटींच्या कामावरून शिंदे-ठाकरे गटात रणकंदन; बिनशेपटीच्या वाघाच्या मुसक्या आवळा

Mangesh Mahale

Kolhapur: कोल्हापुरात सध्या श्रेयवादाची लढाई सर्वच राजकीय पक्षात सुरू झाली आहे. अशातच 100 कोटी रुपयांच्या रस्त्यांवरून आता शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेत रणकंदन सुरू आहे. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महापालिकेत आढावा बैठक घेतल्यानंतर त्यावर ठाकरे गटाने निशाणा साधला आहे.

100 कोटींच्या रस्त्यांवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून टक्केवारीसाठी सोकावलेल्या बिनशेपटीच्या वाघाला पायबंद घालावा, असा टोला लगावत ठाकरे गटाने निशाणा साधला आहे.

ठाकरे गटाचे शिवसेना शहराध्यक्ष रविकरण इंगवले यांनी पत्रक काढून, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष यांच्यावर निशाणा साधला आहे. शहरातील 100 कोटींच्या रस्त्याचे प्रस्ताव उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झाले होते. आता केवळ वर्कऑर्डर झाली आहे. त्यामुळे निधी मीच आणला म्हणत 'निधीतील कामाची मी सांगत नाही तोवर वर्कऑर्डर द्यायची नाही', असा जुलमी आदेश प्रशासनाला देणाऱ्यांना पायबंद घातला पाहिजे, अशी अपेक्षा ठाकरे गट शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली.

शहराचा विकास हा प्रत्येक लोकप्रतिनिधीने केलाय. परंतु विकासामध्ये हुकूमशाही कधीच ठेवली नाही. पण, सध्या विकास म्हणजेच पैसा अशी समीकरणे काही लोकप्रतिनिधींमुळे तयार व्हायला लागली आहेत, असेही पत्रकात म्हटले आहे.

मुश्रीफांनी पालकमंत्री म्हणून घेतलेली कणखर आणि कड़क भूमिका महत्त्वाची असून कोल्हापूरच्या विकासाला उपयोगी ठरणारी आहे. सता व पैसा या समीकरणातून निर्माण झालेल्या भ्रष्टाचाराच्या अजगराला असाच ठेचायचा असेल तर मुश्रीफ यांनी प्रशासनाला ताबडतोब वळणावर आणणे गरजेचे आहे, असे इंगवले यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT