Mahesh Landge, Pimpri Chinchwad Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad BJP News: पिंपरीचे कारभारी आमदार लांडगेच राहणार की भाजप भाकरी फिरवणार ?

BJP Political News: भाजपला पिंपरी चिंचवड शहरात सर्वांना एकत्र घेऊन जाईल असा चेहरा द्यावा लागणार...

सरकारनामा ब्यूरो

उत्तम कुटे

Pimpri Chinchwad : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत भाजपकडून जम्बो राज्य कार्यकारिणी बुधवारी(दि.५) जाहीर करण्यात आली. त्यानंतर आता राज्यातील पक्षाच्या सर्व जिल्ह्यांना नवे जिल्हाध्यक्ष १५ मे पूर्वी दिले जाणार असल्याचे संकेतही देण्यात आले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे कारभारी आमदार महेश लांडगे(Mahesh Landge)च राहणार की भाजपकडूनही भाकरी फिरवली जाणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

भाजपने एक पद,एक व्यक्ती या तत्वाला अनेक ठिकाणी अपवाद केलेला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य कार्यकारिणीतही ते समोर आलं आहे. त्यामुळे संघटनेत अगोदर पद असलेल्यांनाही शहराध्यक्षपद मिळू शकते असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. तसे झाले नाही,तर पक्षाच्या धक्कातंत्राने नवीन चेहराही अध्यक्ष म्हणून समोर येण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड(Pimpri Chinchwad) महापालिकेची निवडणूक दिवाळीदरम्यान होण्याची दाट शक्यता आहे. ती विचारात घेऊन महापालिकेत पुन्हा सत्तेत आणेल,असा चेहरा अध्यक्ष म्हणून भाजप देणार यात शंका नाही. त्यातून विद्यमान अध्यक्ष आणि भोसरीचे पक्षाचे आमदार महेश लांडगे यांनाच दुसऱ्यांदा ही संधी दिली जाण्याचा भाजपात विचार होऊ शकतो.

नुकतीच चिंचवड विधानसभेची अत्यंत प्रतिष्ठेची पोटनिवडणूक आमदार महेश लांडगेंच्या नेतृत्वातच जिंकली आहे. त्यांच्याएवढं तुल्यबळ नाव शहरात या पदासाठी सध्यातरी दिसत नाही. दुसरीक़डे या पदाच्या शर्यतीत असलेल्या काही दावेदारांची नावे कालच्या राज्य कार्यकारिणीत आली आहेत.त्यांना तेथे पदे देण्यात आल्याने त्यांचा पत्ता कट झाल्यात जमा आहे.या कार्यकारिणीत भोसरीपेक्षा चिंचवडला झुकते माप देण्यात आले आहे. त्यामुळे अध्यक्षपद हे भोसरीकडे दिले जाण्याची शक्यता वाढली आहे.

भाजपला पिंपरी चिंचवड शहरात सर्वांना एकत्र घेऊन जाईल असा चेहरा द्यावा लागणार आहे. हे मात्र निश्चित असणार आहेत.त्यामुळे भाजपचा नवीन शहराध्यक्ष कोण होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT