prisoners
prisoners 
पिंपरी चिंचवड

कोरोनामुळे अनेक कच्च्या कैद्यांना जामीन मिळणार

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्यातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक बंदी बंदिस्त आहेत. सध्या जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूची लागण राज्यातील काही भागात झालेली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू केल्या आहेत. तुरुंगातील बंदी जणांना त्याची लागण होऊ नये यासाठी न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार बंदी जणांना तात्पुरता जामीन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा सुनील रामानंद यांनी दिली.                                                                                 

रामानंद म्हणाले, राज्यातील सर्व कारागृहांमध्ये पस्तीस हजाराहून अधिक बंदी बंदिस्त आहे येरवडा,  मुंबई सेंट्रल (ऑर्थर रोड) ठाणे आणि नाशिक या चार मध्यवर्ती कारागृहातील तसेच  इतर कारागृहातील किरकोळ व मध्यम स्वरूपाच्या गुन्हयातील बंद्यांना नियमित जामीन किंवा तात्पुरता जामीन उपलब्ध झाल्यास तुरुंगातील बंद्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल.

राज्यात 45 ठिकाणी साठ कारागृहे आहेत. येथील एकूण क्षमता 24 हजार बंदी ठेवण्याची आहे. सध्या 38 हजार  बंदी ठेवण्यात आले आहेत.  कारागृहातील बंद्यांची तसेच त्यांना भेटावयास येणार्‍या नातेवाईकांची आवक-जावक कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.  न्यायालयीन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फिजिकल प्रोडक्शन 100 टक्के थांबवून ते व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे करण्याची विनंती करण्यात आली आहे.

पैशाअभावी जामीन न मिळालेल्या बंद्यांसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार असल्याचे श्री रामानंद यांनी सांगितले.
 याशिवाय प्रिझन गेटमधून येणा-या प्रत्येकाची मेन गेटच्या बाहेरच वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. या वैद्यकीय तपासणीमध्ये ताप,  खोकला, सर्दी अशी साधारण शारीरिक तपासणी असणार आहे. तुरुंगामध्ये वैद्यकीय तपासणी शिबिर ही सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दुर्दैवाने एखाद्या बंद्यास लागण झाल्यास त्याला स्वतंत्र आयसोलेटेड सेलमध्ये ठेवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT