murlidhar mohol
murlidhar mohol 
पिंपरी चिंचवड

महापौर मोहोळांनीच `पीएमपी`ला लावला ब्रेक #fightagainstcorona

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पीएमपीएमएलच्या बसची सेवा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी थेट स्वारगेट येथील मुख्यालयात जाऊन बंद केली. यासंदर्भात महापौर मोहोळ यांनी विविध माध्यमातून पाठपुरावा करूनही सेवा सुरूच असल्याने त्यांनी पीएमपीएमएलचे मुख्यालय गाठून सेवा थांबवली. संध्याकाळी पाचनंतर एकही बस डेपोच्या बाहेर पडणार नसून केवळ अत्यावश्यक सेवेपुरत्याच बसेस उपलब्ध होणार आहेत.

महापौर मोहोळ यांनी मुख्यालय गाठून यावेळी अध्यक्षा नयना गुंडे यांना वस्तुस्थिती आणि नागरिकांच्या मागणीची माहिती देत सेवा बंद करण्याची सूचना केली. त्यावर महापौर मोहोळ यांनी केलेल्या सूचनेनुसार गुंडे यांनी निर्णय घेत दुपारी पाचपासून बस बंद करण्याचा निर्णय घेतला. यावेळी वेळी संचालक आणि स्थायीचे अध्यक्ष हेमंत रासणे, शंकर पवार हेही उपस्थित होते. पुणे शहरात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेत बससेवा थांबवणे आवश्यकच होते. या निर्णयामुळे बाहेर पडणाऱ्या पुणेकरांवर लगाम बसणार आहे.

या संदर्भात माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, पुण्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक असून मी आधीपासूनच सार्वजनिक बससेवा बंद करण्यासाठी प्रयत्न करत होते. कोरोनाच्या आपण दुसऱ्या टप्प्यात असलो तरी तिसऱ्या टप्प्याची भीती आपल्या सर्वांसमोर आहे. त्या पार्श्वभूमीवर वेळीच पावले उचलणे अपेक्षित आहेत. त्याचनुसार निर्णय घेऊन बससेवा बंद केली. बससेवा सुरू असणे म्हणजे नागरिकांना शहरात वापरण्यासाठी एक प्रकारचे प्रोत्साहनच होते'.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT