पिंपरी चिंचवड

मनसे आपल्या पूर्वाश्रमीच्या आमदाराच्या प्रतिमेला मारणार जोडे

सरकारनामा ब्युरो

पिंपरी : दहीहंडी उत्सवात मुंबईत घाटकोपरचे भाजप आमदार व प्रवक्ते राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद आज पिंपरी-चिंचवडमध्ये उमटले. मनसेचे पूर्वाश्रमीचे आमदार असलेल्या कदम यांच्या प्रतिमेला मनसेच जाहीरपणे जोडे मारणार आहे. तर शिवसेनेनेही या घटनेचा निषेध करीत कदम यांच्याकडून  तातडीने माफीची मागणी केली आहे. अन्यथा ते सुद्धा कदम यांच्या प्रतिमेला जाहीर जोडे मारो आंदोलन करणार आहेत.

कदम दरवर्षी दहीहंडी उत्सव दणक्यात करतात. सेलिब्रिटींची हजेरी त्याला असते. यावेळी,तर मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीसही आले होते. ते येण्यापूर्वी कदम यांनी भाषण केले. मतदारांची कुठली कुठली कामे करू असे सांगताना त्यांनी मुलींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. एखाद्या तरुणाला नकार दिलेल्या तरुणीला पळवून आणून मी त्याला मदत करीन, असे वक्तव्य कदम यांनी केले होते.

ते आक्षेपार्ह असल्याने शहर महिला आघाडीने पत्रक काढून त्याचा निषेध केला. तसेच कदम यांच्या माफीची मागणीही केली. अन्यथा परवा पिंपरी चौकात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. राम कदम हे भाजपमध्ये येण्यापूर्वी मनसेचे आमदार होते. त्यांचे वक्तव्य आक्षेपार्ह आणि निवषेधार्ह असल्याने त्यांच्या प्रतिमेला जोडे मारणार आहोत, असे मनसेचे शहरप्रमुख आणि नगरसेवक सचिन चिखले यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT