पिंपरी चिंचवड

आढळरावांना धडकी भरेल असा उमेदवार राष्ट्रवादी देणार : गारटकर

प्रताप भोईटे

न्हावरे :  राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पंतप्रधान करायचे असेल, तर राज्यात किमान 25 च्या आसपासच्या खासदार निवडून येणे गरजेचे आहे. त्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा खासदार होणे अपेक्षित आहे. या वेळी पक्षाकडून विद्यमान खासदाराची धडकी भरेल, असा सक्षम उमेदवार दिला जाणार आहे,'' असे आव्हान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माहिती प्रदीप गारटकर यांनी दिले.

न्हावरे (ता. शिरूर) येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बूथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून गारटकर बोलत होते.  कॉंग्रेस पक्षात गटबाजी करून गद्दारी करणारा यापुढे कोणी आढळला, तर याद राखा. त्याला खड्यासारखे बाजूला केले जाईल,'' असा इशारा त्यांनी दिला. शिवसेनेचे शिरूरमधील खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नसल्याची चर्चा नेहमी असते. ही चर्चा फोल ठरविण्यासाठी गारटकर यांनी जोरदार आव्हान दिले आहे. त्यांच्या या आव्हानामुळे राष्ट्रवादीचा आगामी निवडणुकीतील उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. 

गारटकर म्हणाले, "केंद्रातील व राज्यातील सत्ताधाऱ्यांबाबत कोणताच घटक आज समाधानी नाही. सर्वसामान्य लोकांच्यात आज अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. त्याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेऊन सत्तेत परिवर्तन करावे. कारण, येऊ घातलेल्या निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती नक्की होणार आहे. अजित पवार यांना राज्याचे मुख्यमंत्री करायचे असेल, तर एक- एक आमदार निवडून येणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शिरूर- हवेलीचा आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निवडून येणे गरजेचे आहे.'' 

माजी आमदार अशोक पवार म्हणाले, "तालुक्‍यातील विद्यमान लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नसल्यामुळे सामान्य जनता बेहाल झाली आहे. चासकमान व घोड जलाशयात समाधानकारक पाणी उपलब्ध असूनही केवळ नियोजनाअभावी पुरेसे पाणी मिळाले नाही. त्यामुळे शेती उद्‌ध्वस्त होऊन शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. सरकारी पातळीवर कामे होत नसल्यामुळे सर्वसामान्य लोकांची कुचंबणा होत आहे. फक्त कागदोपत्री कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या वल्गना करण्यात येत आहेत. प्रत्यक्षात मात्र तालुक्‍यात कोठे विकासकामे दिसत नाहीत.'' 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT