pimpari chinchwad deputy mayor keshav gholve resigns
pimpari chinchwad deputy mayor keshav gholve resigns  
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे पायउतार झाले अन् बोराटेंचा मार्ग खुला

उत्तम कुटे

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी यांनी पाच महिन्यांतच आपल्या पदाचा राजीनामा आज दिला. या पदावर शहराचे कारभारी आणि भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांचे समर्थक वसंत बोराटे यांची नियुक्ती होणार आहे. 

स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सांगली पॅटर्न, नाही, तर स्थानिक सांगवी पॅटर्न चालला. त्यामुळे भाजपचे अॅड. नितीन लांडगे यांचा पाच मतांनी (दहा विरुद्ध पाच) दणदणीत विजयी झाला. भाजपमधील नाराजीमुळे पिंपरीत सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती होण्याची चर्चा होती. पण, ती चर्चाच राहिली. आगामी निवडणुकीनिमित्त फक्त राष्ट्रवादीने वातावरण निर्मिती करुन घेतली. 

शहराचे कारभारी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थायीतील सह समर्थक सदस्यांनी साथ दिल्याने दुसरे कारभारी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे समर्थक नितीन लांडगे यांचा दणदणीत विजय झाला. त्यानंतर उपमहापौरपदीही याच मतदारसंघातील नगरसेवकाला संधी मिळणार आहे. त्यांना तसा शब्द देण्यात आलेला आहे. गेल्या चार वर्षांत त्यांना एकाही मोठ्या पदावर संधी देण्यात आलेली नव्हती. 

घोळवे यांनी आज संध्याकाळी दिलेला राजीनामा लगेच महापौर माई ढोरे यांनी मंजूर करून तो पुढे आयुक्तांकडे पाठवूनही दिला. मात्र,स्थायी अध्यक्षपदासाठी डावलल्याने काल स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले भोसरीतीलच रवी लांडगे यांचा राजीनामा, मात्र त्यांनी अद्याप मंजूर केलेला नाही. 

दरम्यान, ऊसतोड कामगाराच्या मुलाला उपमहापौर केल्याबद्दल घोळवे यांनी सर्वांचे आभार मानले. टी-ट्वेन्टी सामना मी खेळलो, असे सांगत राहिलेली कामेही मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT