Shankar Jagtap  Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad Assembly Poll 2024 : शंकर जगताप यांनी साधला नागरिकांशी संवाद

शंकर जगताप म्हणाले की, नागरिकांच्‍या विश्वासामुळेच लढण्याची ताकद मला मिळाली आहे. चिंचवड विधानसभेतील जनतेच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहून, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मतदारांनी त्‍यांना प्रतिसाद दिला. नवी सांगवी येथील एमके चौक, समतानगर, गणेशनगर, कीर्तीनगर, समर्थनगर, आदर्शनगर मधील चैत्रबन सोसायटी, सरस्वती पार्क या ठिकाणी नागरिकांशी भेटी गाठी घेत जगताप यांनी मतदारांशी घराघरांत जाऊन संवाद साधला. महिलांनी जगताप यांचे औक्षण केले.

माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, अंबरनाथ कांबळे, बळिराम जाधव, कविता निखाडे, शीतल आगरखेड, सूर्यकांत गोफणे, बाबूराव शितोळे, सखाराम रेडेकर, अशोक कवडे, प्रशांत कडलक, बाळासाहेब पिल्लेवार, सुरेश तावरे, राजू पाटील आदींसह नवी सांगवीतील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला, तरुण महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्‍थित होते.

शंकर जगताप म्हणाले की, नागरिकांच्‍या विश्वासामुळेच लढण्याची ताकद मला मिळाली आहे. चिंचवड विधानसभेतील जनतेच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहून, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ देवून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आपल्याला आणायचे आहे.

‘‘गेल्या दहा वर्षांत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी मोठा हातभार लावला होता. शहरातील पाण्याचा प्रश्न, जीवघेण्या वाहतूक समस्येवर तोडगा काढला. शहरातील गावांना ‘स्मार्ट सिटी’ बनवले. आमदार फंडातून चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध भागात विकासात्मक कामे केली. सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला. त्यांनी जनहितासाठी अनेक विकासकामे केली. या कामांमुळेच चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये स्व. लक्ष्मणभाऊ जगताप हे लोकप्रिय ठरले होते. तोच वारसा मी पुढे नेणार आहे.

- शंकर जगताप, भाजप-महायुती उमेदवार, चिंचवड विधानसभा मतदारसंघ.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT