पिंपरी चिंचवड

मराठा आरक्षण फडणवीस सरकारच देणार : पवार

सरकारनामा ब्युरो

पिंपरीः सामाजिक संदर्भ, ताणलेले जातीय संबंध, दिर्घकालीन सामाजिक व सांस्कृतिक परिणामातून समाजबांधवांचे वैचारिक व प्रबोधन करण्यासाठी 5 ऑगस्टला बारामती (जि.पुणे) येथून निघालेली मराठा संवाद यात्रा आज पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल झाली. भाजपचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी तिचे स्वागत केले. 

मराठा तरुण, तरुणींनी भावनेच्या भरात आत्मघाताचे पाऊल उचलू नये, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले. यातून प्रश्न सुटण्याएेवजी कुटूंबियांना व समाजबांधवांना दु:ख होणार आहे, असे ते म्हणाले. तसेच सर्व न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच मराठा समाजाला शाश्वत आरक्षण देईल, असेही त्यांनी सांगितले.

बारामतीचे प्रशांत (नाना) सातव यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरु झाली आहे. क्रांतीदिनी 9 ऑगस्टला तिचा मुंबईत समारोप होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी राज्यभर विविध आंदोलने सुरु आहे. अनेक तरुण, तरुणींना यासाठी आत्मबलीदान केले आहे. सामाजिक संदर्भ, ताणलेले जातीय संदर्भ, असंतोषाने पेटून भावनिक झालेली समाजाबांधव, आत्मघात करु पाहणारा समाजबांधव, कायदा हातात घेऊ पाहणारे युवक यांच्याशी संवाद साधून आपल्या न्याय्य मागण्यांसाठी प्रशासन व सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. 

भक्ती-शक्ती चौकात नगरसेवक तुषार हिंगे, जांबे गावचे सरपंच अंकुश गायकवाड, संदिप ताथवडे, मच्छिंद्र शिंदे, प्रमोद ससार,दत्तात्रय पवार, सचिन पाटील, कुमार ससार, प्रविण घरत यांनी यात्रेचे स्वागत केले. या संवाद यात्रेत समाज प्रबोधन व मराठा आरक्षण चळवळी विषयी जनजागृती करणारी माहिती पत्रके वाटून समाजबांधवांशी संवाद साधण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT