पिंपरी चिंचवड

वाढदिवसाचा खर्च टाळून नाना काटेंकडून एक लाख रूपये पूरग्रस्तांना

सरकारनामा ब्युरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे गटनेते नाना काटे यांनी आपल्या वाढदिवसावरील (ता.१५) जाहिरातबाजी टाळून पूरग्र्स्तांसाठी एक लाख रुपये नुकतेच दिले. या मदतीचा धनादेश त्यांनी सकाळ रिलीफ फंडात जमा केला. सकाळच्या पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयात सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्याकडे हा चेक काटे यांनी सुपूर्त केला.

एवढेच नाही,तर आपल्या वाढदिवसानिमित्त हारतुरे आणि भेटीऐवजी पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू व  त्यांच्या मुलांसाठी शालेय साहित्य देण्याचे आवाहन काटे यांनी काही दिवसांपूर्वीच केले आहे. त्याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. त्यांच्या कार्यालयात हे जिन्नस मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत. ते घेऊन शुक्रवारी मी स्वतः सांगली व कोल्हापूरला जाणार असल्याचे काटे यांनी सांगितले. रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचे उद्या आयोजन केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT