पिंपरी चिंचवड

पिंपरी महापालिका आणि महापौरही 36 वर्षाचे

सरकारनामा ब्युरो

पिंपरी : पुढील महिन्यात 11 तारखेला पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 36 वा वर्धापनदिन आहे. योगायोगाची बाब म्हणजे पालिकेचे महापौर राहुल जाधव यांनीसुद्धा यावर्षी 36 व्या वर्षात पदार्पण केले आहे. असा दुर्मिळ योगायोग पालिकेच्या 36 वर्षाच्या इतिहासात प्रथमच जुळून आला आहे. 

या योगायोगाखेरीज पालिकेचा यावेळचा वर्धापनदिन अनेक अर्थाने वेगळा ठरणार आहे. एकतर, यानिमित्त येणाऱ्या मान्यवरांना प्रथमच पुष्पुगुच्छाऐवजी पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले जाणार आहे. हाच कित्ता पुरस्कार्थींच्या बाबतीतही गिरविला जाणार आहे. त्यांना पुरस्काराबरोबर पुष्पगुच्छाऐवजी पुस्तक पहिल्यांदाच दिले जाणार आहे. यावर्षीच्या वर्धापनदिनाला आतापर्यंतच्या (1986 पासूनचे) माजी नगरसेवकांना आमंत्रित केले जाणार आहे. 11 ऑक्‍टोबरला संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम घेतली जाणार आहे. त्यासाठी शाळा,कॉलेजची मदत घेण्यात येणार आहे. सहाही प्रभागातील प्रत्येकी दोन अशा बारा सफाई कामगारांचा वर्धापनदिनी सत्कार केला जाणार आहे. वर्धापनदिनाच्या प्राथमिक तयारीची बैठक काल पालिकेत झाली. यानंतर अशीच आणखी एक बैठक होऊन त्यात कार्यक्रमाची रूपरेषा निश्‍चित केली जाणार असल्याच महापौरांनी `सरकारनामा'ला सांगितले.  
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT