Narendra Modi Sarkarnama
पिंपरी चिंचवड

PM Visit in Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम पुण्यात अन् धरपकड पिंपरीत

Pimpri : आंदोलकांनी नरेंद्र मोदी गो बॅक, नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी, नरेंद्र मोदी हाय हाय, अशा घोषणा दिल्या.

उत्तम कुटे

Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासह विविध विकासकामांची भुमीपूजने, उदघाटनासाठी आले. (PM Visit in Pune News) त्याचवेळी पिंपरीत त्यांच्या या दौऱ्याविरोधोत इंडिया आघाडी, पुरोगामी पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मात्र,पोलिसांनी ते चिरडले.

पिंपरी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात येणार होते. (Pune) मात्र, तेथे निदर्शनाचा फलक फडकावण्यापूर्वीच पोलिसांनी ज्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार होते ते कॉंग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांना ताब्यात घेतले. आंदोलन सुरु करण्यापूर्वीच इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी व्हॅनमध्ये घातले.

त्यामुळे संतप्त आंदोलकांनी (Narendrra Modi) नरेंद्र मोदी गो बॅक, नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी, नरेंद्र मोदी हाय हाय, अशा घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. (Maharashtra) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, देवेंद्र तायडे, प्रदीप पवार, स्वाती कदम, निर्मला जाधव,अन्थोनी झेवियर, सचिन कदम, विशाल जाधव, ज्ञानेश्वर मलशेट्टी आदींचा त्यात समावेश आहे.

मोदींचा दौरा संपल्यानंतर आम्हाला सोडतील,असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मानव कांबळे यांनी `सरकारनामा`ला सांगितले. दरम्यान, मोदींच्या दौऱ्याची खबरदारी म्हणून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कालपासूनच अनेक संघटनांच्या पदाधिकार्यांना ताब्यात घेतले. काहींना घरीच स्थानबद्ध केले. संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष सतीश काळे यांना वाकड पोलिसांनी ठाण्यावर बोलावून स्थानबद्ध केले.

तर, छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक धनाजी येळकर-पाटील यांना सकाळी घरीच पोलिसांनी स्थानबद्ध केले. मोदींच्या दौऱ्याला विरोध केला नसतानाही स्थानबद्धतेची कारवाई केल्याबद्दल काळे यांनी संताप व्यक्त केला. तर, ही लोकशाहीची गळचेपी असून ती सहन केली जाणार नाही. जनतेच्या प्रश्नावर छावा कायम रस्त्यावर असेल, असे येळकर म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT