MLA Sunil Shelke Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Pimpri News : आमदार शेळकेंनी दाखविला 'मार्ग' ; थेट 'पीआय'ना धरले धारेवर..!

MLA Sunil Shelke Highway Traffic : पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी स्वत: रस्त्यावर उतरले..

Uttam Kute

Pimpri News : शनिवार, रविवार आणि पुणे-मुंबई 'एक्सप्रेस वे'च नाही, तर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही होणारी मोठी वाहतूक कोंडी, हे आता समीकरणच झाले आहे. त्यातही जुन्या हायवेवरील सोमाटणेचा (ता. मावळ) टोलनाक्याबरोबर आता ती देहूरोड सेंट्रल चौकातही होऊ लागली आहे. काल दि. ९ रोजी संध्याकाळीही तीच परिस्थिती झाली.

त्यावेळी तेथून जात असलेले मावळचे आमदार सुनील शेळके Sunil Shelke यांना खाली उतरून ती वाहतूक सुरळीत करावी लागली. दरम्यान दीड वर्षापूर्वीही अशाच मोठ्या रांगा सुटीच्या दिवशी आठवड्याच्या शेवटी लागल्याचे दिसताच त्यावेळीही आमदार शेळकेंनी सोमाटणे टोलनाक्यावर धाव घेतली. स्वत: तेथे उभे राहून वाहने सोडून कोंडी फोडली होती.

तरीही त्यानंतर पुन्हा १ ऑक्टोबरला त्याची पुनरावृत्ती झाली. कारण शनिवार, रविवारच्या सुट्यांमुळे पुणे-मुंबई जुना आणि नवा असे दोन्ही हायवे त्यातही टोलनाके जाम झाले. सोमाटणेलही त्याला अपवाद राहिला नाही. त्यामुळे स्थानिक आमदार म्हणून शेळकेंनी पुन्हा धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

तर, काल शनिवारी आमदार शेळकेंना पुन्हा पुणे-मुंबई जुन्या हायवेवर देहूरोड सेंट्रल चौकात पुन्हा मोटारीतून खाली उतरत तेथे झालेली मोठी वाहतूक कोंडी सोडवावी लागली. यावेळी मात्र त्यांचा पारा चढला. या महामार्गावर व त्यातही वरील दोन ठिकाणी वांरवार होणाऱ्या मोठ्या वाहतूक कोंडीबाबत अनेकदा सांगूनही परिस्थिती जैसे-थे असल्याबद्दल प्रथम त्यांनी वाहतूक विभागाचे स्थानिक पोलिस निरीक्षक साबळेंना फैलावर घेत धारेवर धरले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नंतर थेट 'सीपी' विनयकुमार चौबेंनाच फोन करुन महामार्गावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीबद्दल माहिती देवून याबाबत कायमचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले. त्यानंतर डीसीपी (ट्र्र्रॅफिक) बापू बांगर हे घटनास्थळी धावले आणि वाहतूक मार्गी लावण्यात आली.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT