Pimpri Chinchwad BJP Political News  Sarkarnama
पिंपरी चिंचवड

Pimpri Chinchwad BJP Political News : रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतात इंधनाचे दर वाढले; भाजपचा जावईशोध

Bala Bhegade News : ''यावेळी जनहिताची कामे न करणे हे २००४ ते २०१४ दरम्यान केंद्रातील यूपीए सरकारचे मुख्य काम होते. ''

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chinchwad : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपने देशभर `मोदी@9`हे विशेष जनसंपर्क अभियान सुरु केले आहे. त्याअंतर्गत बुधवारी (ता.७) पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाने पत्रकारपरिषद घेऊन गेल्या नऊ वर्षात केलेल्या कामांचा पाढा वाचला. यावेळी त्यांनी अगोदर केंद्रात सत्तेत असलेल्या युपीए सरकारवर कडाडून हल्लाबोल केला.

भाजप (BJP)कडून बुधवारी(दि.७) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गेल्या नऊ वर्षात पिंपरी-चिंचवडच नाही,तर संपूर्ण देशातील न सुटलेला आणि गेली चाळीस वर्षे प्रलंबित असलेला रेड झोनचा प्रश्न येत्या वर्षभरात सोडवला जाईल असा दावाही मावळचे माजी आमदार बाळा ऊर्फ संजय भेगडे यांनी यावेळी केला आहे. यावेळी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष भोसरीचे आमदार महेश लांडगे(Mahesh Landge),पक्षाच्या चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, विधान परिषद सदस्या उमा खापरे आणि शहर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी जनहिताची कामे न करणे हे २००४ ते २०१४ दरम्यान केंद्रातील यूपीए सरकारचे मुख्य काम होते. कामचुकारपणा ही त्यांची नीती व धोरण होते असा टोला भाजपने लगावला. तर, मागील नऊ वर्षात गतिमान सरकारमुळे विकास झाला असा दावाही केला आहे. या काळात केलेल्या कामांचा पाढाही यावेळी भेगडे यांनी वाचून दाखवला.

''रशिया-युक्रेन युद्धामुळे....''

मोदी@9 अभियानाचे मावळ लोकसभा संयोजक आणि मावळचे माजी आमदार बाळा ऊर्फ संजय भेगडे(Bala Bhegade) यांनी मोठा दावा केला आहे. त्यावर या भाजपच्या सत्ताकाळात महागाई, बेकारी वाढली हे मोदी सरकारचे अपयश नाही का अशी विचारणा केली असता बेरोजगार कमी करण्यात यशस्वी झाल्याचा दावा भेगडे यांनी केला. तर,रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधन दर वाढल्याचे गणित त्यांनी मांडले.हे वाढलेले इंधन दर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने नाही,तर शिंदे-फडणवीस सरकारने कमी केल्याचे त्यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT