पिंपरी चिंचवड

शरद पवार, धनंजय मुंडे यांच्या तोफा आता शिरूरमध्ये दणाणणार! 

डी. के. वळसे पाटील

मंचर : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आता पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उतरत असून, त्यांची सभा मंचर येथील रामनगरी मैदानावर गुरुवारी (ता. 25) दुपारी चार वाजता जाहीर सभा होणार आहे,'' अशी माहिती आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांनी दिली.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची सभा तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील बाजार मैदानावर बुधवारी (ता. 24) सकाळी 9 वाजता होणार आहे. 

मंचर येथील सभेला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, कॉंग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, आरपीआय (कवाडे, गवई, साळवे, खोब्रागडे आदी गट) स्वाभिमानी शेतकरी संघटना व मित्रपक्षांचे राज्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभेची जय्यत तयारी सुरू आहे, अशी माहिती पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी दिली.
पवार यांनी कोल्हे यांच्या प्रचारासाठी हडपसर येथे या आधी एक सभा घेतली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT