पिंपरी चिंचवड

पिंपरी पालिका आयुक्तांचा पाय आणखी खोलात 

सरकारनामा ब्युरो

पिंपरीः निष्क्रीय पिंपरी-चिंचवड पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यामुळे शहराचे मोठे नुकसान झाल्याने त्यांची त्वरित बदली करण्याची मागणी शिवसेना आणि कॉंग्रेसने सोमवारी केली. शिवसेनेने,तर थेट मुख्यमंत्री असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेच ती केल्याने तिचे गांभीर्य वाढले आहे. 

एकूणच आयुक्तांविरुद्ध वाढती नाराजी लक्षात घेता येत्या काही दिवसांतच त्यांची बदली होण्याची दाट शक्‍यता आहे.दरम्यान,आयुक्तही पिंपरीत राहण्यास आता इच्छूक नसून त्यांनाही बदलीचे वेध लागले आहेत. त्यातूनच ते आज पालिकेत आले नसल्याचे समजले. 

आयुक्तांची आजपर्यंतची वाटचाल ही निष्क्रिय व धोरण बोटचेपे राहिल्याने शहराचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे, असे त्यांच्या बदलीची लेखी मागणी मुख्यमंत्र्याकडे केलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (मावळ) गजानन चिंचवडे यांनी सांगितले.आरोपांच्या फैरीच त्यांनी आयुक्तांवर झाडल्या. 

आयुक्तांची संशयास्पद व वादग्रस्त कचरा निविदाप्रक्रिया, केंद्राच्या स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये महापालिकेची घसरण, × पाणीपुरवठा योजनेचे तीन तेरा, धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा असताना देखील वारंवार पाणी कपातीचे धोरण, अनेक संशयास्पद निविदाप्रकीया, विकास कामे व ठेकेदारांना मुदतवाढ, मार्च च्या अगोदरच्या ठेकेदारांच्या बिलांबाबत योग्य वेळी निर्णय न घेणे ,

पालिकेच्या एकमेव सर्वोपचार वायसीएम रुग्णालयातील सेवेचा बोजवारा, खातेनिहाय चौकशीतून अधिकारी व कर्मचाऱ्यांची निर्दोष मुक्तता, विविध विभागातील वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना अभय, नागरी हिताच्या सारथी हेल्पलाईन कडे दुर्लक्ष, हॉकर्स झोन धोरण अंमलबजावणीत अपयश आदी आरोप आयुक्तांविरोधात करण्यात आले आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT