NCP MP Supriya Sule
NCP MP Supriya Sule 
पिंपरी चिंचवड

राष्ट्रवादीचा उद्या मुंबईत भव्य मोर्चा; खासदार सुप्रिया सुळे नेतृत्व करणार

सरकारनामा ब्युरो

पिंपरी : जालना जिल्हयातील १९ वर्षीय तरुणीवर झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्या सकाळी ११ वाजता मुंबईतील चुनाभट्टी पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. खासदार सुप्रिया सुळे व पक्षाचे मुंबई विभागीय अध्यक्ष आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली चेंबुर लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलिस ठाणे असा हा भव्य मोर्चा काढला जाणार आहे.

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील या तरुणीवर मुंबईतील चेंबुर परिसरात चार नराधमांनी विषारी ड्रग्ज पाजवून सामूहिक बलात्कार केला होता. या पीडितेची महिनाभर मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज काल रात्री अखेर संपली आहे. या घटनेला एक महिना उलटल्यानंतरही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. या घटनेच्या निषेध म्हणून हा मोर्चा काढला जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT