Three Corona Patients from Pimpri discharged
Three Corona Patients from Pimpri discharged 
पिंपरी चिंचवड

'कोरोना' मुक्त होऊन 'ते' तिघे पोहचले घरी!

सरकारनामा ब्युरो

पिंपरी  : शहरातील कोरोना बाधित 12 रुग्णांपैकी पहिल्या तीन रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आल्याने हे रुग्ण पूर्णपणे बरे झाले. आज शुक्रवारी (ता. 27) वायसीएम रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. तसेच, त्यांना पुढील 14 दिवस होमकोरंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.  त्यांना टाळ्या वाजवून 'वाय सी एम' मधून निरोप देण्यात आला. 

दरम्यान, महापौर उषा ढोरे, सत्तारूढ पक्षनेते  नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, डॉ.वाबळे, डॉ. सोहनी यांनी या तीनही व्यक्तींना निरोगी आयुष्य जगण्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, महापालिका पदाधिकारी, आयुक्त, वायसीएम रुग्णालयाचे डॉक्टर, आरोग्य विभागाचे कर्मचारी, सफाई कामगार यांचे रुग्णांनी आभार मानले. 

शहरावरील संकट अजून टळलेले नसून नागरिकांनी सरकारच्या सूचनांचे पालन करून महापालिकेला सहकार्य करावे, आपली सुरक्षा आपल्याच हाती असून सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. शहरात सहा दिवसामध्ये कुठलाही कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. ही सुखद बाब असून महापालिका यंत्रणा कायम आपल्या सेवेसाठी सज्ज आहे. तरी, घराबाहेर कोणीही पडू नये, आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT