BJP, MLA Laxman Jagtap, Nitin Gadkari News
BJP, MLA Laxman Jagtap, Nitin Gadkari News  Sarkarnama
पिंपरी चिंचवड

गडकरींना चिंता आजारी लक्ष्मणभाऊंची तर त्यांना मतदारसंघातील वाहतूक कोंडीची...

उत्तम कुटे

पिंपरी : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे मिशन चांदणी चौकसाठी काल पुणे जिल्हा दौऱ्यावर होते. चांदणी चौक व परिसराची हवाई पाहणी केल्यानंतर त्यांनी मातोश्रींचे निधन झालेले भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landge) यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

त्यानंतर चिंचवडचे भाजपचे (BJP) आजारी आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांची भेट घेऊन विचारपूस केली. मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील (रावेत, किवळे ते चांदणी चौक देहूरोड बायपास) वाहतूक कोंडीचा पिंपरी-चिंचवडकरांना कसा फटका बसतो, याकडे त्यांनी गडकरींचे लक्ष यावेळी वेधले. (BJP, MLA Laxman Jagtap, Nitin Gadkari News )

पु्णे-सातारा रोडवर जशी मोठी कोंडी होते, तशीच ती पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत देहूरोड बायपासवरही होते. त्याचा मोठा फटका लाखो आयटीयन्सला दररोज बसतो आहे. त्यातही सकाळी व संध्याकाळी या कोंडीमुळे स्थानिक त्रस्त होतात. हा भाग आमदार जगतापांच्या मतदारसंघात येत असल्यामुळे तेथील ही वाहतूक कोंडी कमी करण्याचे साकडे आपल्या भेटीसाठी आलेल्या गडकरींना त्यांनी घातले. त्यावर महामार्ग अधिकाऱ्यांशी गडकरींनी लगेचच चर्चा केली. एवढेच नाही, तर ही कोंडी फोडण्यासाठी महामार्ग दुरुस्तीचा आदेशही दिला.

आय़टीनगरी हिंजवडी ते चाकण (व्हाया नाशिकफाटा-भोसरी) असा मेट्रोमार्ग करण्याची मागणीही जगतापांनी केली. त्यावर या मार्गाचा डीपीआर करून द्या, त्याला मंजूरी देण्यासाठी सबंधितांना सांगतो, असे आश्वासनही गडकरींनी दिल्याची माहिती आमदार जगतापांचे बंधू आणि भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी `सरकारनामा`ला दिली.

जगतापांची भेट घेण्यापूर्वी गडकरींनी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष आणि पक्षाचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे भोसरी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वन केले. आमदार लांडगेंच्या मातोश्री हिराबाई किसनराव लांडगे यांचे २४ सप्टेंबरला अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या सांत्वनासाठी राज्यभरातून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा ओघ अजून सुरुच आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्य़ाचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी परवा लांडगेंचे प्रत्यक्ष भेटून सांत्वन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT