Shahajibapu Patil
Shahajibapu Patil sarkarnama
पिंपरी चिंचवड

बारामतीकर नगरपालिका पाहायला नाही आले तर वडीलांचे नाव लावणार नाही : शहाजीबापू पाटील

दत्तात्रय खंडागळे

सांगोला : सांगोला नगरपालिकेच्या विविध कामांसाठी आतापर्यंत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे पाठपुरावा करून 20 कोटी रुपये मंजूर करुन घेतले आहेत. विकास कामांच्या बाबतीत मी कधीच राजकारण करत नाही. यापुढे आमच्या विचारसरणीच्या लोकांना सांगोला नगरपरिषदेमध्ये काम करण्याची संधी द्या, पश्चिम महाराष्ट्रातील आदर्शवत नगरपालिका केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. विकास पाहण्यासाठी बारामतीकर नगरपालिका पाहायला नाही आले तर नावापुढे वडीलांचे नाव लावणार नाही, असे आश्वासन शिवसेनेचे (Shivsena) सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी दिले आहे.

सांगोला शहरातील भुयारी गटार योजनेच्या कामाचा शहाजी पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, शिवसेनेचे नेते भाऊसाहेब रुपनर, भाजप (BJP) तालुका अध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, मुख्याधिकारी कैलास केंद्रे, बाबुराव गायकवाड, उदय घोंगडे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता रविकांत ढावरे, शिवसेना शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष तानाजी पाटील, दीपक खटकाळे, समीर पाटील, तोहिद मुल्ला, प्रा. संजय देशमुख, आनंद घोंगडे, अनिल खडतरे, शिवाजी बनकर, मधुकर बनसोडे, सोमनाथ लोखंडे, सोमेश यावलकर, पूजा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शहाजीबापू पाटील म्हणाले, सांगोला शहरातील पाणीपुरवठ्याचे मोठे काम झाले आहे. वास्तविक पाहता पाणीपुरवठ्याचे काम झाल्यानंतर भुयारी गटाराचे काम होणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही मी 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाल्यापासून भुयारी गटार योजनेचा सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावला. भुयारी गटारीचे काम चालू झाले की लगेच शहरातील रस्ते व लाईटचे काम जलदगतीने करून सांगोला शहराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. शहराच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारचा निधी मी कमी पडू देणार नाही.

भुयारी गटार योजनेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून हे काम लवकर चालू केले जाईल, असे ही त्यांनी सांगितले. विकासासाठी मी कधीही राजकारण करत नाही. यापुढेही शहर विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन विकास केला जाईल. मात्र, आमच्या विचारसरणीच्या लोकांना संधी दिली तर पश्चिम महाराष्ट्रातील आदर्शवत ही सांगोल्याचे नगरपालिका केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. बारामतीसारखा या शहराचा विकास केला जाईल. त्यामुळे यापुढे बारामतीकरही नगरपालिका पाहायला नाही, आले तर मी नावापुढे वडिलांचे नाव लावणार नाही असेही पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील म्हणाले, आमदार शहाजीबापू यांचा मुंबईचा दौरा कधी मोकळ्या हाताने परत येत नाही. शहाजीबापू आमदार झाल्यापासून तालुक्यातील पिण्याच्या पाण्याच्या योजना, शेतीच्या पाण्याच्या योजना, तालुक्यातील रस्ते व मूलभूत सुविधा करिता महाविकास आघाडी सरकारकडून भरघोस निधी खेचून आणला आहे. यावेळी प्रा. पी. सी. झपके यांनीही मनोगत व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT