सप्ताहात मंगळ-शनी केंद्रयोग होत असून, रवीचे भ्रमण ज्येष्ठा नक्षत्रातून मूळ नक्षत्रात होणार आहे. महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींचे राजीनामे होतील. या काळात भूकंप, ज्वालामुखी यांसारख्या घटना संभवतात. अनेक ठिकाणी आगीच्या दुर्घटना, रेल्वे दुर्घटना, वाहन अपघात यांतून हानी संभवते. मंदिरे, धार्मिक स्थळे, महत्त्वाच्या इमारती, महत्त्वाची शहरे, महत्त्वाच्या व्यक्तींना घातपाताचा धोका संभवतो. दहशतवादी कारवाया, स्फोटक घटना घडविण्याचे प्रयत्न होतील. या काळात मोठी विमान दुर्घटना संभवते.
धार्मिक किंवा जातीय वादविवाद या काळात तणाव निर्माण करणारे राहतील.या काळात महत्त्वाच्या पक्षात मोठी फूट पडण्याची शक्यता राहील. राज्य किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील. तर काही राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तीच्या घटना या काळात संभवतो. सरकारी अधिकारी महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींच्या बदल्या किंवा राजीनामे या काळात संभवतात. दशमातील गुरूमुळे निवडणुकांमधून सत्ताधारी पक्षांना अनुकूल स्थिती दर्शविते. नगर परिषदांनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षांचा वरचष्मा कायम राहील.
या काळात मोठी थंडी किंवा काही प्रदेशात अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळित होण्याची शक्यता राहील. या काळात शेजारी देशांमध्ये नैसर्गिक आपत्ती (भूकंप, अवकाळी पाऊस), हिंसाचार, स्फोटक घटना यांतून नुकसान होऊ शकते. खेळाडूंसाठी हा काळ प्रतिकूल असून, भारतीय खेळाडूंना अपयश दर्शविते. काही महत्त्वाच्या खेळाडूंच्या निवृत्तीची घोषणा होईल.
शनी-मंगळ योगामुळे मोठे गुन्हेगार पकडले जातील. दहशतवादी, गुन्हेगार यांना तुरुंगवास किंवा शिक्षा होईल. पोलिस-लष्कराकडून मोठी कारवाई होईल. शत्रू देशांवर कारवाई होण्याची शक्यता राहील. पुलवामा, दिल्ली घातपाताचा बदला घेतला जाईल.
महाराष्ट्राची रास धनू असून, ७ डिसेंबर रोजी मंगळाचे भ्रमण पुढील दीड महिने धनू राशीतून होणार आहे. तर पुढील पौर्णिमा अमावस्या धनू राशीतून होणार आहे. यामुळे डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता राहील. चतुर्थातील शनीबरोबर केंद्र योग होत असल्यामुळे स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अशांतता निर्माण होऊ शकते. प्रमुख पक्षातील नेते व कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठा संघर्ष अनुभवास येईल. या काळात अनेक ठिकाणी हाणामारी, तोडफोडीच्या घटना होण्याची शक्यता राहील.
बिबट्याच्या हल्ल्यांबरोबरच दहशतवादी-नक्षलवादी संघटनांचा धोका या काळात वाढण्याची शक्यता राहील. गुन्हेगारी, दरोडे, भीषण अपघात, आगीच्या दुर्घटना यांचे प्रमाण महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता राहील. धार्मिक व्यक्ती, धर्मप्रमुख, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षण संस्था, मंदिरे यांना हा काळ प्रतिकूल राहील. मोठ्या थंडीबरोबर, अवकाळी पावसाची शक्यता या काळात राहील. आघाडी-युतीमधील मित्रपक्षांमधील वादविवाद टोकाला जातील.
मेष : सप्ताहातील चंद्र-गुरू युतीमुळे छोटे प्रवास, सहली, तीर्थयात्रा होतील. भावंडे, नातेवाइकांच्या गाठीभेटी होतील. घरातील वातावरण आनंद राहील. कायदेशीर कामासाठी वेळ व पैसा खर्च होईल.
वृषभ : आर्थिक स्थितीमध्ये चांगले बदल होतील. मोठी गुंतवणूक होईल. कुटुंबात आनंदाची घटना घडेल. सप्ताहात छोटे प्रवास, सहली होतील. शनी-मंगळ केंद्र योगामुळे सहकारी मित्र वर्गाशी मतभेद संभवतात.
मिथुन : मन आनंदी-उत्साही राहील. नवीन गोष्टी शिकण्याकडे कल वाढेल. धार्मिक विधी, उपासना होईल. नोकरी-व्यवसायातील कटकटी वाढतील. वैवाहिक जीवनात मनस्ताप-वादविवाद संभवतात.
कर्क : व्हिसा/पासपोर्टची (परदेशगमन) कामे होतील. मोठे कर्ज मिळेल. सप्ताहातील शांती- मंगळाचा केंद्रयोग नोकरीमध्ये बदल-बदली करणारा राहील. हितशत्रूंवर विजय मिळवाल. निवडणुकीत यश मिळेल.
सिंह : मोठी इच्छा पूर्ण होईल. मनासारख्या घटना घडतील. मोठ्या व्यक्तींचा परिचय-सहवास मिळेल. मित्रपरिवार नातेवाइकांकडून मदत मिळेल. वारसा हक्काच्या कामात कटकटी वाढतील.
कन्या : व्यापारात मोठी वाढ होईल. सामाजिक-राजकीय क्षेत्रात पद-प्रतिष्ठा वाढेल. निवडणुकीत यश लाभेल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.
तूळ : तीर्थयात्रा-दानधर्म होईल. नावलौकिक-प्रसिद्धी मिळेल, पदवी, पुरस्कार मिळतील. सत्पुरुषांचा सहवास सत्संग घडेल. भावंडे-नातेवाइकांशी मतभेद संभवतात. नोकरीमध्ये कटकटी वाढतील.
वृश्चिक : लॉटरी, शेअर बाजारात पैसा मिळेल. छोटे प्रवास, यात्रा कराल. नोकरी-व्यवसाय बदल करण्याचे विचार येतील. मुलांसाठी खर्च करावे लागतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अपघात संभवतात.
धनू : वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. कोर्टकचेरीमध्ये मनासारखे निर्भय होतील. भागीदारीच्या व्यवसायात फायदा होईल. शनी-मंगळ केंद्र योगामुळे घर-जागेच्या कामात कटकटी संभवतात.
मकर : मोठे कर्ज मंजूर होईल. हितशत्रूंचा उपद्रव कमी होईल. आर्थिक ताण वाढण्याची शक्यता राहील. भावंडे-नातेवाइकांचा त्रास सहन करावा लागेल. कोर्टकचेरी टाळावी.
कुंभ : शेअर बाजारात लाभ होईल. नवीन मित्र-मैत्रिणी भेटतील. मोठी इच्छा पूर्ण होईल. शनी- मंगळ केंद्र योगामुळे कुटुंबात कलहाचे प्रसंग उद्भवतील. जुन्या येण्याच्या वसुलीसाठी कटकटी होतील.
मीन : घराजवळ बदलीसाठी प्रयत्न होतील. घरात धार्मिक, मंगलकार्ये होतील. पाहुण्यांची वर्दळ वाढेल. मोठ्या व्यक्तींचा पाहुणचार कराल. वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.