Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Uddhav Thackeray Sharad Pawar Nana Patole Sarkarnama
राजकीय भविष्य

Political Horoscope: युती, आघाडीबाबत संभ्रम वाढणार! मोठ्या प्रमाणावर बंडखोरी

Maharashtra Politics Astrology Predictions 28 june to 4 July 2025: भविष्यनामा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात होणार असून, त्या दृष्टीने काही घडामोडी या काळामध्ये घडू शकतात.

सरकारनामा ब्यूरो

सिद्धेश्वर मारटकर

शुक्राचा २९ जूनला वृषभ राशीत प्रवेश होत असून, पुढे शुक्र-हर्बल युती होणार आहे. वृषभ राशीतील या योगामुळे शेअर मार्केट उच्चांकी पातळीवर जाण्याची शक्यता असून, सोन्या-चांदीच्या भावातसुद्धा विक्रमी वाढ होण्याची शक्यता वाटते. स्त्रीवर्ग किंवा कलाकारांसाठी पुढील काळ अनुकूल असून, महिलांना विशेष मान-सन्मान, मोठ्या पदांवर संधी मिळेल. कलाकार, चित्रपटांना मोठे यश, प्रसिद्धी, पुरस्कार किंवा मानसन्मान प्राप्त होतील. या काळात रुपयाचे मूल्य वाढेल. चलनामध्ये मोठे बदल होतील.

या जोडीला रवी-गुरू मिथुन राशीतील योगामुळे लेखक, साहित्यिक, प्रकाराचे मानसन्मान होतील. मात्र, या काळात मंगळ-केतू युती होत असल्यामुळे मोठ्या भूकंपाची शक्यता वाटते. दिल्ली, उत्तर भारत, तसेच ईशान्येकडील प्रदेशात मोठे भूकंप होण्याची शक्यता वाटते. या योगामुळे दहशतवादी कारवाया, स्फोटक घटना संभवतात.

रेल्वे, वाहन अपघात, घातपात; तसेच सीमेवरील तणाव या काळात वाढण्याची शक्यता वाटते. या काळात धार्मिक स्थळे, यात्रा या ठिकाणी अपघात चेंगराचेंगरी होण्याची शक्यता राहील. हा काळ धार्मिक स्थळे, धार्मिक क्षेत्रातील व्यक्ती, पक्षप्रमुख, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती यांच्यासाठी प्रतिकूल राहील. या क्षेत्रातील मोठ्या व्यक्तीच्या मृत्यूच्या घटना या काळात संभवतात.

बुध-प्लुटो प्रतियोगामुळे या काळात वादग्रस्त वक्तव्यांमुळे जातीय, धार्मिक तेढ वाढण्याची शक्यता राहील. वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठे नेते अडचणीत येतील. या काळात राजकीय क्षेत्रामध्ये मोठ्या नाट्यमय घटना अनुभवास येतील. युती, आघाडीबाबत संभ्रम वाढणार असून, अफवा पसरविल्या जातील.

अनपेक्षित व आश्चर्यकारक पद्धतीने वेगळीच युती-आघाडी होण्याची शक्यता राहील. या काळात सत्ताधारी पक्ष, किंवा नेत्यांवर मोठे आरोप होतील. घटक पक्षांतील नाराजीनाट्य चव्हाट्यावर येतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात होणार असून, त्या दृष्टीने काही घडामोडी या काळामध्ये घडू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर बंडखोरी किंवा पक्षांतर होईल.

तणाव वाढण्याची शक्यता शनी-नेपच्यून योगामुळे शेजारील राष्ट्रांकडून घूमजाव, फसवणुकीचे प्रयत्न होतील. सीमेवरील घुसखोरी कुरापती वाढल्याची शक्यता असून, सीमेवर तणाव राहील. या योगामुळे विमानसेवेत गोंधळ, अफवा अनुभवास येतील. विमान भरकटणे, इमर्जन्सी लँडिंग, विमानसेवा विस्कळित होणे, या घटना अनुभवास येतील. विमानसेवेवर प्रतिकूल परिणाम होऊन काही सेवा अचानक रद्द होतील. इराण-इस्राईल, रशिया-युक्रेन; तसेच इतर देशांतही संघर्ष वाढण्याची शक्यता असून, नऊ ऑगस्टपर्यंत संपूर्ण जगावर युद्धाचे सावट राहील.

अमेरिकेच्या सहभागानंतर महायुद्धाचा धोका संभवतो. या संघर्षाबाबत इतर देशांची भूमिका संदिग्ध राहिल्याने त्यांच्या भूमिकेविषयी संभ्रम कायम राहील. जुलैच्या पूर्वार्धात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोठी पर्जन्यवृष्टी संभवते. नदी, धरणे यांची पातळी वाढेल. अनेक ठिकाणी अतिवृष्टी किंवा पूरसदृश स्थिती अनुभवास येईल. मात्र मोठ्या पावसाने शेतकरी वर्गात मोठा दिलासा मिळेल. पुढील वर्षाची पाण्याची चिंता राहणार नाही.

या काळात घरांवरील दरोडे, फसवणूकत, चोरी, आत्महत्या, अपहरण यांसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता असून, सायबर गुन्ह्यांमध्ये अनेकांचे नुकसान होऊ शकते.

साप्ताहिक राशिभविष्य २८ जून ते ४ जुलै २०२५

मेष : धनस्थानातील शुक्राचे आगमन मोठे आर्थिक लाभ देणारे असून उत्प‌न्नात वाढ होईल. कुटुंबात आनंददायक वातावरण राहील. शेअर्ससारख्या व्यवसायात नुकसान संभवते.

वृषभ : प्रवास, मनोरंजन, संगीत यांचा आनंद घ्याल. मात्र, सप्ताहाच्या सुरवातीला घरातील वातावरण गरम राहील. घर, जागेच्या कामात कटकटी होतील. उत्तरार्धात मुलांकडून मनस्ताप संभवतो.

मिथुन : मोठ्या प्रवासासाठी अनुकूल काळ असून, परदेशगमनाची संधी मिळेल. उंची वस्तू, वस्त्र, अलंकार व कुटुंबासाठी मोठे खर्च होतील. कर्तृत्व सिद्ध होईल. सप्ताहात भावंडांशी मतभेद टाळावेत.

कर्क : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन ओळखी होतील. स्त्री वर्गाकडून फायदा होईल. आर्थिक जबाबदारी वाढेल. मुलांसाठी खर्च होतील. छोटे प्रवास जपून करावेत.

सिंह : दशमातील शुक्राचे आगमन नोकरी व्यवसायाला यश देणारे राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला रागावर नियंत्रण ठेवावे. चिडचिड होईल, उत्तरार्धात कौटुंबिक चिंता राहील.

कन्या : भाग्यातील शुक्राचे आगमन तीर्थयात्रा, प्रवास घडविणारे राहील. प्रसिद्धी, नावलौकीक मिळेल. धार्मिक मंगलकार्य घडतील. गुरूजनांचा सहवास लाभेल.

तूळ : अष्टमातील शुक्राचे भ्रमण वारसा हक्क, कमी श्रमातून फायदा देणारे राहील. विमा, पेन्शनची कामे होतील. मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल

वृश्चिक : सप्ताहातील शुक्राचे भ्रमण तरुणांचे विवाह जमण्यासाठी अनुकूल राहील. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. भागीदारीतील व्यवसायाला फायदा होईल. उत्तरार्धात मित्र-सहकारी यांच्यात समज-गैरसमज होतील.

धनू : नोकरीमध्ये चांगले बदल घडविणारा काळ आहे. वेतनवाढ, उत्पन्नात वाढ होईल. नवीन नोकरीची संधी मिळेल. सप्ताहात धार्मिक कार्यात अडथळे संभवतात.

मकर : पंचमातील शुक्राचे आगमन मुलांकडून आनंद देणारे राहील. शेअर्ससारख्या व्यवसायात मोठा फायदा होईल. तरुणांना प्रेमप्रकरणात यश मिळेल. भावंडांकडून मनस्ताप होईल.

कुंभ : घरी प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी अनुकूल काळ राहील. मात्र जोडीदाराशी वादविवाद टाळावेत. कोर्टकचेरीमध्ये त्रास संभवतो. भागीदारीच्या व्यवसायात कटकटी होतील. उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

मीन : भावंडे, नातेवाईकांचे विवाह जमतील. आनंदाची बातमी कळेल. हितशत्रूंवर विजय मिळेल. मात्र नोकरीमध्ये कटकटी, बदली किंवा बदलीचे योग संभवतात. जोडीदाराशी समज-गैरसमज होतील

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT