8th pay commission arrears news:निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आठव्या वेतन आयोगाची समिती स्थापन करण्यात आली आहे.आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू केला असल्याचे मानले जात आहे. वेतनवाढीबाबत अंतिम निर्णय या वर्षांच्या (२०२६)अखेरीस किंवा २०२७ पर्यंत होण्याची शक्यता आहे.
जर आत्तापासून 8 वेतन लागू झाला असेल तर एरियर म्हणून किती रक्कम मिळेल, याची चर्चा केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये सध्या सुरु आहे.
आठव्या वेतन आयोग लागू झाला तर पगार किती वाढेल, याबरोबरच एरियस किती मिळेल, याची आकडेमोड कर्मचारी करीत आहेत.
आठव्या वेतन आयोगाची एरियर रक्कम ही सर्वात मोठा आर्थिक फायदा असेल. कर्मचाऱ्यांना एकरकमी मोठी रक्कम मिळण्याची शक्यता असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
आयोगाची समिती सध्या कर्मचारी संघटना आणि इतर संबंधितांकडून सूचना आणि शिफारशी घेत आहे. या शिफारशींनंतरच वेतनवाढ आणि पेन्शन वाढ किती होणार हे निश्चित होणार आहे. त्यामुळे त्याल उशीर होत असल्याची माहिती आहे.
१ जानेवारी २०२६ पासून जर आठवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असल्याचे समजते. पण प्रत्यक्ष वेतनवाढ देण्यास आयोगाच्या कामामुळे उशीर झाला, तर कर्मचाऱ्यांना १८ ते २४ महिन्यांचा एरियर मिळू शकतो, असे यातील तज्ज्ञ व्यक्तीचे मत आहे.
एरियरची ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारावर अवलंबून असेल. असे असले तर एका अहवालानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना सुमारे ३.६ लाख ते १५ लाख रुपये इतका एरियर मिळण्याची शक्यता आहे.
वेतनवाढ फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते.महागाई आणि वाढलेला जीवनावश्यक खर्च लक्षात घेता हा फॅक्टर वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. फिटमेंट फॅक्टर जास्त असल्यास बेसिक सॅलरी, पेन्शन आणि एकूण उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते.
फिटमेंट फॅक्टर हा वेतन आयोगातील सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो.
याच आधारे बेसिक पगार वाढवला जातो.
७ व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर २.५७ होता.
८ व्या वेतन आयोगासाठी कर्मचारी संघटना ३.० ते ४.३५ फिटमेंट फॅक्टरची मागणी करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.