pooja khedkar mpsc (2).jpg sarkarnama
प्रशासन

Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्यानंतर आता 'ते' 9 अधिकारी देखील रडारवर

Chaitanya Machale

Pune News : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा देऊन वादग्रस्त ठरलेल्या प्रशिक्षणार्थी 'आयएएस' अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत देखील गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी येत आहेत. खेडकर यांच्याप्रमाणेच दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर करून पदभरती झाल्याचे बोलले जात आहेत.

'एमपीएससी'च्या परीक्षेत दिव्यांग कोट्यातून अधिकारी झालेल्या दहा जणांपैकी नऊ जणांच्या प्रमाणपत्रांवर शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता हे नऊ अधिकारी 'एमपीएससी'च्या रडारवर आले आहेत. या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची छाननी, पडताळणी केली जाणार आहे. तसेच या नऊ जणांची शारीरिक चाचणी देखील होणार आहे. पुढील एक-दोन दिवसांत ही चाचणी होण्याची शक्यता असून यात काही गैरप्रकार झाला असल्यास तो समोर येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत 10 उमेदवार दिव्यांग कोट्यातून भरती झाले होते. यापैकी नऊ जणांच्या प्रमाणपत्रांवर आक्षेप घेतला जात आहे. त्यामुळे त्याची चौकशी करून हे सर्व उमेदवार खरोखरच दिव्यांग आहेत की नाही याची खात्री केली जाणार आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी, तहसीलदारापासून गटविकास अधिकारी यांचा समावेश आहे. ही तपासणी केली जाणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या प्रशिक्षणार्थी 'आयएएस' अधिकारी पूजा खेडकर यांनी देखील दिव्यांगाचे प्रमाणपत्र सादर करून 'यूपीएससीची' परीक्षा दिल्याचे समोर आले.त्यानंतर खडबडून जागे झालेल्या 'एमपीएससी'ने देखील आक्षेप असलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पुन्हा एकदा पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ज्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रावर संशय आहे, अशा सर्व उमेदवारांची शारीरिक तपासणी करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने 'एमपीएससी'ला नुकतेच दिले आहेत. या सर्व उमेदवारांच्या शारीरिक चाचण्या पुढील दोन ते तीन दिवसात होणार आहेत. एकूण 623 पदांसाठी परीक्षा झाली होती. यातील 10 जागा दिव्यांगांसाठी राखीव होत्या. त्यातील नऊ जणांच्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT