Jyoti Kadam News
Jyoti Kadam News Sarkarnama
प्रशासन

Pune Resident Deputy Collector: पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी ज्योती कदम यांची नियुक्ती

सरकारनामा ब्यूरो

Pune News : सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे उपविभागीय अधिकारी ज्योती कदम यांची पुण्याची निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून सोमवारी (दि.१७) याबाबतचे अध्यादेश जारी करण्यात आले आहेत. कदम यांनी आपल्या पदाचा कार्यभार मावळत्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांच्याकडून पदभार स्वीकारला.

ज्योती कदम(Jyoti Kadam) माढा कुर्डुवाडी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती होण्याआधी हवेलीच्या उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. फडणवीस सरकारच्या अखेरच्या टप्प्यात करण्यात आलेल्या प्रशासकीय अधिकार्यांच्या बदल्यांमध्ये कदम यांचा बदलीचा समावेश होता. कदम यांची २१ फेब्रुवारी २०१९ रोजी माढा-कुर्डुवाडी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

ज्योती कदम यांनी याअगोदर पुणे जिल्ह्यात हवेली प्रांत अधिकारीपदासह नायब तहसीलदार, तहसीलदार म्हणून काम पाहिले आहे. २०१६ मध्ये कदम यांनी हवेली प्रांत अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी हवेली प्रांत अधिकारी पदावर शासनाने एकाच वेळी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळे वेगळाच वाद निर्माण झाला होता. अखेर या पदावर अंतिमरित्या ज्योती कदम यांची नियुक्ती करण्यात आली होती.

यामध्ये हवेली प्रांताधिकारीपदी सुरुवातीला संजीव देशमुख यांची नियुक्ती केली. देशमुख यांनी कामाला सुरुवातदेखील केली होती. परंतु आठ तासात शासनाने ऑर्डर बदलून, हवेली प्रांताधिकारीपदी ज्योती कदम यांनी नियुक्ती केली. याबाबत जोरदार चर्चा झाल्यानंतर अखेर शुक्रवारी हवेली प्रांताधिकारी पदी ज्योती कदम यांची अंतिम ऑर्डर काढण्यात आली.कदम यांनी यापूर्वी नायब तहसीलदार, तहसीलदार म्हणून पुणे जिल्ह्यात काम केले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT