Ashok Khemka Retirement : आपल्या 34 वर्षांच्या संपूर्ण कारकिर्दीत एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 57 वेळा बदली झालेले आणि हरियाणातील सर्वात प्रसिद्ध आयएएस अधिकारी अशी ओळख असलेले अशोक खेमका बुधवारी (ता.30) सेवानिवृत्त होत आहेत.
खेमका यांची एक प्रामाणिक अधिकारी म्हणून संबंध देशभरात ओळख आहे. त्यांनी आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक दिग्गज राजकीय नेत्यांशी देखील पंगा घेतला आहे. तर या प्रामाणिकपणामुळेच त्यांची सतत बदली होत राहिली आणि या सततच्या बदल्यांमुळेच देशभरात ओळखले जाऊ लागले.
काँग्रेस नेते आणि सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांच्याशी संबंधित वादग्रस्त गुरुग्राम येथील जमीन व्यवहाराचा पर्दाफाश केल्यानंतर ते देशभरात चर्चेत आले. 1991 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले अशोक खेमका परिवहन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावरून आज निवृत्त होणार आहेत. डिसेंबर 2024 मध्ये त्यांना या पदावर नियुक्त करण्यात आले होते.
भूपेंद्र हुड्डा, रॉबर्ट वाड्रासह यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांना नडणारे IAS अधिकारी अशी अशोक खेमका यांची ओळख आहे. कोलकाता येथे जन्मलेल्या अशोक खेमका यांनी शालेय शिक्षणानंतर आयआयटी खरगपूर येथून कंप्यूटर इंजिनिअरिंगची पदवी घेतली.
त्यानंतर त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमधून संगणक विज्ञानात पीएचडी आणि व्यवसाय प्रशासनात एमबीए केलं. तसंच प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी पंजाब विद्यापीठातून 'एलएलबी'चं शिक्षण पूर्ण केलं.
अशोक खेमका यांची संपूर्ण कारकिर्दीत तब्बल 57 वेळा बदली करण्यात आली. मनोहर लाल खट्टर सरकारने परिवहन विभागातून त्यांची बदली केली. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच त्यांची पुन्हा बदली करण्यात आली. या बदलीनंतर जवळपास दहा वर्षांनंतर पुन्हा परिवहन विभागात खेमका यांची नियुक्ती केली गेली.
दरम्यान, 2023 साली खेमका यांनी तत्कालीन मुख्यमंत्री खट्टर यांना पत्र लिहून दक्षता विभागात एका पदावर काम करून 'भ्रष्टाचार निर्मूलन' करण्याची विनंती केली होती. तर भ्रष्टाचार संपवण्यासाठी आपण आपल्या कारकिर्दीचे बलिदान दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.