Iqbal Chahal Sarkarnama
प्रशासन

BMC'च्या आयुक्त पदावरून हटवलेल्या चहल यांच्याकडे मोठी जबाबदारी; 'या' पदावर नियुक्ती

सरकारनामा ब्युरो

Iqbal Chahal News : मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदावरून हटवल्यानंतर इक्बालसिंह चहल यांची मोठ्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने आता चहल यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली असून, आता ते मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

मुंबई महापालिका (BMC) आयुक्त इक्बालसिंग चहल यांची बदली रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांना 3 वर्षांचा निकष लागू करू नये म्हणून राज्य सरकारने केलेली मागणी निवडणूक आयोगाने दुसऱ्यांदा फेटाळली होती. निवडणूक आयोगानेच चहल यांना पदावरून हटवल्याची घोषणा केली होती. आयुक्त पदावरून हटवल्यानंतर चहल (Iqbal Singh Chahal) यांची आता थेट मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती केली आहे, तर पी वेलरसू (P Velrasu) यांची वर्णी सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आयुक्त पदावरून का हटवलं?

3 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस दिला होता. या आदेशामुळे चहल यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार होत्या. थेट निवडणूक प्रक्रियेत सहभागी नसल्याने आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांना आदेशातून वगळावे, अशी विनंती राज्य सरकारने आयोगाकडे केली होती. मात्र, आयोगाने सरकारची ही विनंती फेटाळून लावली होती. त्यामुळे चहल यांना आयुक्त पदावरून हटविण्यात आले होते.

(Edited By Jagdish Patil)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT