Maharashtra LokSabha Election 2024 Sarkarnama
प्रशासन

Lok Sabha Election 2024: मतदार अन् लोकशाहीचा विवाह...; तुम्हाला लग्नपत्रिका मिळाली का?

Maharashtra LokSabha Election 2024: ज्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली, अशांना मतदान (Loksabha Election Updates) करण्याचे आग्रहाचे निमंत्रण त्यांनी या पत्रिकेद्वारे दिले आहे. पोस्टकार्डावर आकर्षक अशा वेगवेगळ्या जलरंग पेनचा वापर करीत त्यांनी ही पत्रिका तयार केली.

सरकारनामा ब्यूरो

संजय तुमराम

Chandrapur News: मी एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो, मतदानानिमित्त सुट्टी आहे, या सुट्टीचा आनंद उपभोगुया, कुठेतरी सहल काढुया, असा विचार करणाऱ्या मतदारांना त्यांच्या कर्तव्याचा आठवण करुन देण्यासाठी सरकारकडून (latest News Maharashtra Politics) विविध उपक्रम राबवले जात आहे. एका चित्रकला शिक्षकाने मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे, यासाठी अनोखी लग्नपत्रिका तयार केली आहे. ही पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) धूम आहे. या राष्ट्रीय उत्सवात लोकांनी आपले कर्तव्य पार पाडावे, यासाठी सरकार विविध उपक्रम राबवते आहे. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जनजागृती केली जात आहे. याच जनजागृतीचा एक भाग म्हणून आनंदवन येथील अंध विद्यालयाचे कलाशिक्षक परमानंद तिराणिक यांनी चक्क पन्नास पैशाच्या पोस्टकार्डवर 'लोकशाहीचा शुभविवाह' ही अनोखी निमंत्रण पत्रिका स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून मतदारांना आवाहन केले आहे.

यात मतदार आणि लोकशाही यांचा विवाह दाखवण्यात आला आहे. ज्यांनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली, अशांना मतदान (Loksabha Election Updates) करण्याचे आग्रहाचे निमंत्रण त्यांनी या पत्रिकेद्वारे दिले आहे. पोस्टकार्डावर आकर्षक अशा वेगवेगळ्या जलरंग पेनचा वापर करीत त्यांनी ही पत्रिका तयार केली. १८ वर्षांवरील विद्यार्थी, दिव्यांग बांधव आणि युवकांनी आपल्या पालकांना 'प्रिय आई- बाबा' माझ्या उज्वल भविष्यासाठी मतदान करा, असा संदेश यात दिला आहे, तर पोस्टकार्डच्या दुसऱ्या बाजुला मतदानावेळी आपले ओळखपत्र म्हणून ग्राह्य असलेल्या या दहा ओळखपत्रांची माहिती देण्यात आली. ही अनोखी लग्न पत्रिका जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरली आहे.

Maharashtra LokSabha Election 2024

लोकसभा निवडणुकीसाठी अधिकाधिक नागरिकांना मतदान करता यावे, यासाठी संबंधित लोकसभेच्या जागेसाठी मतदान असेल त्या दिवशी सुटी जाहीर करावी. किंवा मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे, यासाठी ठराविक तासांची सवलत द्यावी, असा नियम आहे. मात्र, अनेक खासगी कंपन्या याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आपल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सोडत नसल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) ज्या खासगी संस्था, कंपन्या याकडे दुर्लक्ष करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

लोकसभा निवडणूक (latest News Maharashtra Politics) महाराष्ट्रात पाच टप्प्यांत होत आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिल दुसरा टप्पा 26 एप्रिल तिसरा टप्पा 7 मे, तर चौथा टप्पा 13 मे रोजी तर पाचव्या टप्प्याचे मतदान '20 मे'ला होत आहे.

निवडणुकीमध्ये मतदार असलेले कामगार, अधिकारी तसेच कर्मचारी यांना आपला मतदानाचा हक्‍क बजावण्यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत कामगारांना पूर्ण दिवस सुटी देणे शक्‍य नसेल तर सुटीऐवजी किमान दोन तासांची सवलत देण्यात यावी, अशा सूचना शासनाने सर्व संस्था, आस्थापना यांना दिलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून हा गुन्हा आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT