MLA Gopichand Padalkar welcomes Maharashtra government’s decision to conduct DCC bank recruitment through IBPS, TCS, and MKCL ensuring transparency and fairness. Sarkarnama
प्रशासन

DCC bank jobs Maharashtra : स्थानिक उमेदवारांना लॉटरी! जिल्हा मध्यवर्ती बँकांमधील नोकरभरती प्रकरणी राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय!

Maharashtra cooperative bank recruitment : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक व्हाव्या आणि या भरतीमध्ये भ्रष्टाचार होऊ नये यासाठी राज्य सरकारने आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती IBPS, TCS किंवा MKCL यांसारख्या विश्वासार्ह संस्थांमार्फत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Jagdish Patil

Maharashtra cooperative bank recruitment : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक व्हाव्या आणि या भरतीमध्ये भ्रष्टाचार होऊ नये यासाठी राज्य सरकारने आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती IBPS, TCS किंवा MKCL यांसारख्या विश्वासार्ह संस्थांमार्फत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

तर या निर्णयामुळे पात्र उमेदवारांना न्याय्य संधी मिळणार असून भ्रष्टाचारावर आळा बसेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागील काही महिन्यांपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरकारभारवर प्रश्न उपस्थित केले होते.

शिवाय या बँकामधील नोकरभरतीत पारदर्शकता नसते त्यामुळे मोठा भ्रष्टाचार होतो असा आरोपही त्यांनी केला होता. तर राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या स्तरावरील तालीकेमधील संस्थेची निवड करुन नोकरभरती प्रक्रिया सुरु केली होती.

या भरती प्रक्रियेतील काही संस्थांबाबत संबंधित जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उमेदवार आणि नागरीकांनी तक्रारी करत आक्षेप घेतला होता. अशातच आता या तक्रारी विचारात घेऊन आता सरकारने सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांनी तयार केलेली तालिका रद्द करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

तसंच यापुढे राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती प्रक्रिया IBPS (इंस्टीट्यूट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन), TCS-आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) व MKCL (महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लि.) यापैकी कोणत्याही संस्थेमार्फत राबविण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

तसंच पदभरती करताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या सूचना देखील या निर्णयात देण्यात आल्या आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे कार्यक्षेत्र जिल्ह्यापुरते मर्यादीत आहे. तसेच या बँकांचे सर्व सभासद त्या जिल्ह्यातील असतात. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिल्यास असे कर्मचारी बँकेचे ग्राहक / सभासद ठेवीदार यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतात, असं शासन निर्णयात नमूद केलं आहे.

या निर्णयाची माहिती देण्यासाठी गोपीचंद पडळकर यांनी एक्सवर पोस्ट करत 'भ्रष्टाचाराला मूठमाती देणारा ऐतिहासिक निर्णय' असं म्हणत या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'भ्रष्टाचाराला मूठमाती देणारा ऐतिहासिक निर्णय! जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती आता IBPS, TCS किंवा MKCL यांसारख्या विश्वासार्ह संस्थांमार्फत होणार आहे. पात्र उमेदवारांना न्याय्य संधी मिळणार असून भ्रष्टाचारावर आळा बसेल.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT