DA hike impact on salary calculation: केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक खूशखबर आहे, ती म्हणजे होळीपूर्वी या कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे. कारण महागाई भत्त्यात वाढ होणार असून यामुळं कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे. एकूण १ कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना यामुळं फायदा होणार आहे. त्यामुळं यंदाचा पगार वाढीव रक्कमेसह मिळणार असलं तरी नेमकी ही पगारवाढ किती असेल जाणून घेऊयात.
सरकारी नियमांनुसार, वर्षातून दोनवेळा महागाई भत्ता अर्थात डिअरनेस अलाऊंस (DA) दिला जातो, यामध्ये वाढही केली जाते. पहिली वाढ ही जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी असते ज्याची घोषणा मार्चमध्ये केली जाते. तर दुसरी वाढ ही जुलै ते डिसेंबर या सहा महिन्याच्या कालावधीसाठी होते ज्याची घोषणा दसरा किंवा दिवाळीच्या जवळपास होत असते. गेल्यावर्षी केंद्र सरकारनं डीएमध्ये ३ टक्क्यांनी वाढ केली होती.
त्यामुळं एकूण महागाई भत्ता ५८ टक्के झाला होता. आता यामध्ये दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे, त्यामुळं एकूण महागाई भत्ता ६० टक्के होणार आहे. पण ही वाढ ७ व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत होणार आहे.
कारण ८ व्या वेतन आयोगाची आता स्थापना झाली असून १ जानेवारी २०२६ पासून हा आयोग लागूही झाला आहे. पण अद्याप त्याच्या संपूर्ण शिफारशी येऊन त्याच्या अंमलबजावणीला दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. याबाबत नागरिकांकडून हरकती देखील मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळं जोपर्यंत ८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या जात नाहीत, तोपर्यं ७ व्या वेतन आयोगानुसारच लागू असतील.
यंदाच्या सहामाहीत डीएमध्ये २ टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळं एकूण डीए ६० टक्के होईल, त्यामुळं साहाजिकच कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि निवृत्ती वेतनधारकांच्या मानधनात बेसिक पगारात २ टक्क्यांनी वाढ होऊन पगार हातात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.