Prakash Ambedkar Sarkarnama
प्रशासन

Vanchit News : निवडणूक आयोगाचा आंबेडकरांना मोठा धक्का; लोकसभेला वंचितला एक नाही तर 3-3 चिन्हं

Prakash Ambedkar And Election Commission : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या 19 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या होत आहे. त्यासाठी वंचितला निरनिराळे निवडणूक चिन्हे मिळाले आहेत.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : महाविकास आघाडीत जागावाटपावरून वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रकाश आंबेडकरांनी राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत आपल्या उमेदवारांची घोषणाही केली. दरम्यान, त्यांनी निवडणूक आयोगाकड चिन्हासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यानुसार आयोगाने त्यांना तीन चिन्हे प्रदान केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान येत्या 19 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या होत आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीला (Vanchit) निरनिराळे निवडणूक चिन्हे देण्यात आले आहेत. लोकसभेच्या पाचपैकी चार मतदारसंघात वंचितला तीन वेगवेगळे निवडणूक चिन्ह मिळालेली आहेत. परिणामी एकाच निवडणुकीत वंचितवर तीन चिन्हांवर निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या चिन्हांचा समावेश

निवडणूक आयोगाने (ECI) सोमवारी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवार आणि त्यांना वितरित झालेल्या निवडणूक चिन्हांनी माहिती दिली. त्यानुसार वंचित बहुजन आघाडीला रामटेक आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात गॅस सिलिंडर, भंडारा लोकसभा मतदारसंघात उसाची मोळी घेतलेला शेतकरी तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात रोड रोलर हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मध्यंतरी नवी दिल्लीत जाऊन निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी गॅस सिलिंडर, शिट्टी किंवा रोड रोलर यापैकी एक निवडणूक चिन्ह मिळावे, अशी मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने वंचितला एकच निवडणूक चिन्ह देण्याचे टाळले आहे. आता आयोगाच्या निर्णयानुसार वंचितला पाचपैकी चार लोकसभा मतदारसंघात तीन निवडणूक चिन्हांवर लढावे लागणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT