Collector Office Jalgaon
Collector Office Jalgaon sarkarnama
प्रशासन

दप्तर जमा न करणे ग्रामसेविकेला भोवले; जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावली न्यायालयीन कोठडी

कैलास शिंदे :सरकारनामा ब्यूरो

जळगाव : बदली झाल्यानंतर दप्तर जमा न केल्याने जळगाव जिल्हा न्यायदंडधिकारी (District Collector) अभिजित राऊत (Abhijit Raut) यांनी ग्रामसेविकेचा (Gramsevak) एक महिन्याची न्यायालयीन कोठडी सुनावली.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील ग्रामसेवक प्रियांका बाविस्कर यांची यावल तालुक्यातील चुंचाळे येथे बदली झाली. त्या नवीन बदली जागेवर रुजू झाल्या मात्र, त्यांनी आपल्या पूर्वीच्या कालावधीतील कागदपत्रे त्या ठिकाणी जमा केली नाहीत. जिल्हा परिषद सदस्य पल्लवी सावकारे यांनी या बाबत जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली, त्यानुसार त्यावर सुनावणी झाली.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या प्रकरणी ग्रामसेविका प्रियांका बाविस्कर यांना एक महिन्याची न्यायालयीन कोठडी सुनावली, या बाबतचे आदेश त्यांनी यावल पोलिस निरीक्षक याना दिले आहेत.

हेही वाचा :

भाजप नेत्याकडून तरुणीवर अॅसिड फेकण्याची धमकी

कल्याण : एका ३४ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली भाजपचे (BJP) माजी नगरसेवक संदीप गायकर (Sandip Gaikar) वर्ग न्यायालयाने गायकर यांना 3 डिसेंबपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गायकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी प्रकल्याण येथील एका महिलेने ही फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप गायकर याने जुन्या इंस्टाग्राम अकाउंटवर अश्लील मेसेज व फोटो टाकून सोशल अकाउंटस व व्हॉटस ॲपवर बदनामी केल्याचाही आरोप पिडीताने केला आहे. तसेच, पिडीत तरुणीला सोशल मीडियावरून अश्लील मेसेज पाठवून धमक्या देत असे. याशिवाय तरुणीचा पाठलाग करत तिला समाजात व नातेवाईकांमध्ये बदनामी करण्याची आणि ॲसिड टाकून चेहरा खराब करण्याची धमकी देत असे. याशिवाय गायकर याने तरुणीच्या चेहऱ्यावर बोचकरुन तिचा विनयभंग केल्याचेही तरुणीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 2019 ते 6 सप्टेंबर 2021 या कालावधीत पश्चिमेकडील आधारवाडी चौक, आग्रा रोड आणि वायलेनगर परिसरात हे प्रकार घडल्याचे तरुणीने म्हटले आहे.

गायकर हे मुंबई महापालिकेत 2005 ते 2010 आणि 2015 ते 2020 या कालावधीत नगरसेवक होते. त्यांनी स्थायी समिती सभापतीपदही भुषविले आहे. याप्रकरणी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, जर कोणी चूक केली असेल तर कायद्यानुसार योग्य ती चौकशी झाली पाहिजे, असे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT