Udddhav Thackeray - Parambir Singh- Sharad Pawar
Udddhav Thackeray - Parambir Singh- Sharad Pawar Sarkarnama
प्रशासन

राष्ट्रवादीचा आग्रह : परमवीरसिंग यांच्या निलंबनाची फाईल मुख्यमंत्र्यांकडे

मृणालिनी नानिववडेकर

मुंबई : राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात आज मोठ्या घडामोडी घडल्या. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना मुदतवाढ न मिळाल्याने निवृत्त होऊन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार बनले. दुसरीकडे देवाशिष चक्रवर्ती हंगामी मुख्य सचिव बनले. वादग्रस्त पोलिस अधिकारी परमवीरसिंग (Parambir singh) हे अनेक चौकशांच्या फेऱ्यात असताना त्यांच्या निलंबनाची तयारी प्रशासनाने पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांवरील कारवाईचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतात. त्यामुळे राष्ट्रवादीने आता मुख्यमंत्र्यांकडे तसा आग्रह धरला आहे.

गृह विभागाने परमवीरसिंग यांच्या निलंबनाची फाईल मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर केली आहे. तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करणार्या परमवीर यांच्यावर कारवाईबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेस प्रारंभापासून आग्रही आहे. मात्र त्यांचे निलंबन काय साधी विभागीय चौकशीही सुरु झालेली नाही. या संबंधीची कागदपत्रे दोनवेळा परत करण्यात आली आहेत असे समजते.

या सर्वांवर कडी झाली ती काल. परमवीर व दुसरा वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे यांनी परस्परांची भेट घेतल्यानंतर यांनी थेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अधिक अक्रमक झाली आहे. या भेटीची चौकशी होईल असे विधान आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. निलंबनाबाबतही लवकरच कारवाई होईल, असेही ते म्हणाले आहेत.

सदर फाईलचा पाठपुरावा युद्धस्तरावर सुरु असल्याचेही समजते. अर्ज न करता कामावर न येणे, हे कारणही निलंबनासाठी पुरेसे आहे असे सांगत एका ज्येष्ठ नेत्याने या कारवाईबद्दल होत असलेली दिरंगाई आश्चर्यकारक असल्याचे सांगितले. परमवीरसिंग यांच्याकडे होमगार्डच्या संचालकपदाचा कार्यभार आहे. ते गेली अनेक महिने विना परवानगी रजेवर आहेत. असे असतानाही ते पूर्वसूचना न देता हजर झाले. त्यांना फरार म्हणून घोषित करण्यात आले होते. तरीही त्यांच्यावर कोणतीच प्रशासकीय कारवाई झालेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT