Job Opportunity in Railways Sarkarnama
प्रशासन

Job Opportunity in Railways : आयटीआय उत्तीर्ण तरुणांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची संधी; 1646 पदांची मेगा भरती

North - West Division : उत्तर - पश्चिम विभाग म्हणजे जयपूर विभागाच्यावतीने अप्रेंटिसपदाच्या भरतीची अधिसूचना जारी.

Anand Surwase

Job Opportunity in Railways : आयटीआयचे शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. रेल्वेच्या उत्तर-पश्चिम विभागाच्या वतीने तब्बल 1646 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र ही भरती अप्रेंटिस म्हणून करण्यात येणार आहे. याची उमेदवारांनी नोंद घेणे आवश्यक आहे.

या भरतीचा सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात. भारतीय रेल्वेच्या उत्तर-पश्चिम विभाग म्हणजे जयपूर विभागाच्या वतीने अप्रेंटिसपदाच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार आयटीआयमध्ये विविध ट्रेडचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी अप्रेंटिस म्हणून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची सुरवात दिनांक 10 जानेवारी 2024 पासून सुरू होत असून अंतिम मुदतही 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. यासाठी उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर आपला अर्ज ऑनलाइन सादर करायचा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पात्रता आणि निकष

रेल्वेच्या भरतीकरिता उमेदवार हा 10 वी उत्तीर्ण आणि त्यानंतर संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयची पदवी प्राप्त केलेला असावा. तसेच ज्या उमेदवारास दहावीला 50% पेक्षा जास्त मार्क आहेत. तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील.

तसेच या अप्रेंटिसपदाच्या भरतीसाठी उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षादरम्यान असावे. या भरतीममध्ये एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल 5 वर्षे आणि आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे, तर दिव्यांगांसाठी 10 वर्षांपर्यंतची कमाल मर्यादेपर्यंत सूट देण्यात आली आहे.

अर्जाची प्रक्रिया

रेल्वे विभागाच्या वतीने विविध विभागाअंतर्गत करण्यात येणाऱ्या अप्रेंटिसच्या एकूण 1646 पदांच्या भरतीसाठी उमेदवारांनी आयटीआयच्या ट्रेडची सविस्तर माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहावी. त्यानुसार त्यात दिलेल्या पात्रतेनुसार उमेदवारांनी आपला अर्ज www.rrcjaipur.in या संकेतस्थळावर सादर करावा. अर्ज सादर करताना आवश्यक असलेली सर्व माहिती देणे गरजेचे आहे.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांना संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यासाठी उमेदवारास आपले आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारास कागदपत्र पडताळणीवेळी आपले मूळ आधारकार्ड दाखवणे आश्यक असेल. दरम्यान, या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क भरायचे आहे. मागासवर्गीय उमेदवारासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची निवड त्यांच्या गुणवत्तेनुसार केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांची सर्व कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना रेल्वे विभागाकडून स्टायपेंड दिला जाणार आहे. या भरतीसंदर्भात उमेदवारांनी अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वे विभागाची सविस्तर जाहिरात पाहावी. जाहिरात पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा - https://rrcjaipur.in/storeWebFiles/545_718951.pdf

(Edited by Amol Sutar)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT