Kolhapur News: इंस्टाग्राम वरील रिल्सने अनेक युजर्सना भुरळ घातली आहे. रोज तासान् तास रिल बघण्यात नेटकरी वेळ घालवत असतात. अशातच रिल बनवण्याची संख्या ही तितकीच लक्षणीय आहे. हौशी रिल स्टारकडून समाज उपयोगी रिल्स देखील बनवले जातात. पण काही हौशी रिल स्टारकडून कोल्हापूरमध्ये सरकारी मालमत्तेचा चुकीचा वापर करून स्वतःला प्रसिद्धी झोतात आणण्याचा प्रयत्न झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव येथील सरकारी शाळेचा उपयोग करत आणि त्यांच्या शालेय साहित्याची नासधूस करत सिंघम स्टाईल रिल बनवला आहे. इतकच नव्हे तर शाळा व्यवस्थापनाकडे केवळ फोटोची परवानगी घेत माजी विद्यार्थ्यांनी हा प्रताप केल्याचे उघडकीस आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार घडला आहे. शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र जाधव यांना या रिलची भनक सुद्धा लागलेली नाही. माजी विद्यार्थ्याने केवळ आपण फोटोशूट करणार असल्याची परवानगी घेतली, असल्याचे स्पष्टीकरण मुख्याध्यापक जाधव यांनी दिले आहे. दरम्यान ग्रामस्थांना हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्याध्यापकांना चांगलेच धारेवर धरत रील स्टारला समज देऊन सोडले आहे.
एकीकडे राज्य सरकार सरकारी शाळा सुधारण्यावर भर देत आहे. शाळातील पटसंख्या वाढवण्यासाठी भिंतीवरती चित्र आणि रंग रंगोटी करून शालेय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे. सुरक्षा देखील अबाधित राहावी. यासाठी गावातीलच शाळा व्यवस्थापन समिती नेमली गेली आहे. मात्र मुख्याध्यापकांच्या अशा वागण्याकीमुळे इंस्टाग्राम वरील रिल्स स्टारचे फावले आहे.
समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हिंदी चित्रपटातील बाजीराव सिंघम याचा डायलॉग असलेला हा रिल आहे. रिल स्टार चार चाकी गाडीतून शाळेत एन्ट्री करतो. वर्गात एन्ट्री केल्यानंतर खुर्चीला लाथ मारतो अन् सिंघम चे डायलॉग बोलतो. अशा पद्धतीचा हा रील आहे. मात्र शालेय साहित्याची नासधूस केल्यानंतर ग्रामस्थांनी मुख्याध्यापकांना चांगलाच समज दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.