Abhijeet Bangar Sarkarnama
प्रशासन

IAS Transfer : ठाण्याची सुभेदारी सांभाळण्यासाठी आणलेल्या बांगरांची तडकाफडकी बदली; आयोगाचा CM शिंदेना धक्का

Sunil Balasaheb Dhumal

Thane News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मर्जीनुसार ठाणे महापालिकेची सुभेदारी सांभाळण्यासाठी नेमलेले आयुक्त अभिजित बांगर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. गंभीर बाब म्हणजे आाचरसंहितेत बांगारांची बदली झाल्याने ने राजकीय वर्तुळात उलटसुलजट चर्चा आहे. आता बांगरांना बदली करून मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर धाडण्यात आले आहे. (IAS Transfer)

बांगर हे मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या जवळचे मानले जातात. तरीही त्यांची उचलबांगडी केल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळ आवाक झाले आहे. लोकसभेच्या तोंडावर झालेली बांगरांची बदली ही शिंदेंना धक्का मानला जात आहे. आता बांगर यांच्या जागी कोण येणार आणि ते ठाण्याचा कारभार सक्षमपणे सांभाळणार का, याकडे राज्याचे लक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री खुर्चीत बसल्यानंतर शिंदेंनी (Eknath Shinde) राज्यभरातील प्रशासनात आपली माणसे नेमले. विशषतः मुंबई परिसरातील बहुतांश महापलिकांमध्ये आपला शब्द पाळणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यांची त्यांनी वर्णी लावली. ठाकरे सरकारमध्ये नवी मुंबई महापालिकेत (BMC) आयुक्त पदावर असलेल्या बांगरांना शिंदेंनी ठाण्यात नेले. शिंदे पिता-पुत्र आणि बांगर असे समीकरण जुळले होते. मात्र लोकसभेच्या आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच मुख्यमंत्री शिंदेंच्या मर्जीतील बांगर यांची बदली करण्यात आली आहे. (Thane)

दरम्यान, वसई विरार महानगरपालिकेतील पाच उपायुक्तांच्या बदल्याही निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शासनाच्या नगरविकास खात्याने केल्या आहेत. एकाच वेळी पाच जणांच्या बदल्या करण्याची नामुष्की सरकार पहिल्यांदाच आली आहे. वसई विरार महानगरपालिकेतील उपायुक्त पंकज पाटील, डॉ. विजय द्वासे, तानाजी नरळे, चारुशीला पंडित आणि नयना ससाणे या अधिकाऱ्यांच्या शासनाने बदल्या केल्या आहेत. त्यांना बदलीनंतर कोणती पोस्टिंग दिली, याबाबत मात्र आदेशात नमूद केले नाही. त्यामुळे या तडकाफडकी झालेल्या बदल्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT