FDA Commissioner Rajesh Narvekar Sarkarnama
प्रशासन

IAS Rajesh Narvekar : मंत्री झिरवाळांच्या खात्याचा पंचनामा सुरुच! अन्न व औषध मंत्रालयाच्या आयुक्तांचीही बदली; IAS राजेश नार्वेकरांकडे आता नवी जबाबदारी

IAS Rajesh Narvekar : एफडीए लाच प्रकरणानंतर आयुक्त राजेश नार्वेकर यांची परिवहन विभागात बदली करण्यात आली आहे, तर मंत्री नरहरी झिरवाळ यांचे सचिव रामदास गाडे यांना मूळ पशुसंवर्धन विभागात परत धाडण्यात आले आहे.

Hrishikesh Nalagune

IAS Rajesh Narvekar : अन्न व औषध मंत्रालयात घडलेल्या लाच प्रकरणानंतर सुरु असलेला कारवाईचा धडाका आता थेट मंत्रालयाच्या आयुक्तांपर्यंत येऊन पोहोचला आहे. अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त राजेश नार्वेकर यांची परिवहन आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. यापूर्वी मंत्री नरहरी झिरवाळ यांचे खाजगी सचिव रामदास गाडे यांना कार्यमुक्त करून त्यांना मूळ विभागात पुन्हा पाठवण्यात आले आहे. ते पशुसंवर्धन विभागात सहाय्यक आयुक्त आहेत.

राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी (20 फेब्रुवारी) परिवहन आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. विवेक भीमनवार यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष या पदावर नियुक्ती झाल्यामुळे ते पद रिक्त होते. नार्वेकर यांची परिवहन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर सायंकाळी त्यांनी पदभार स्वीकारला. राजेश नार्वेकर हे 2009 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत.

राजेश नार्वेकर यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. 1994 मध्ये महाराष्ट्र प्रशासकीय सेवेतून उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी यापूर्वी ठाणे जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणूनही काम पाहिले आहे. याशिवाय नवी मुंबई महापालिका आयुक्त, सहकार आयुक्त, माहिती तंत्रज्ञान (IT) संचालक अशा विविध जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या आहेत. ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांची अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT