IAS Transfer Order Sarkarnama
प्रशासन

IAS Transfer : 10 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या : तुकाराम मुंढेंकडे दीड वर्षांतच नवी जबाबदारी; लोकेश चंद्रा मुख्यमंत्री कार्यालयात

IAS Transfer : महाराष्ट्रात आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी 10 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. अश्विनी भिडे, लोकेश चंद्र, तुकाराम मुंढे यांना महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती देण्यात आली

Hrishikesh Nalagune

IAS Transfer : महाराष्ट्राच्या प्रशासनातील एकाचवेळी 10 ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य आयुक्त अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. भिडे यांच्या जागी 1993 च्या बॅचच्या लोकेश चंद्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ते महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. भिडे यांच्याकडे मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकचा अतिरिक्त पदभार कायम असणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, हिवाळी अधिवेशन अशा विविध कारणांमुळे महाराष्ट्रात मागील 6 महिन्यांपासून सनदी अधिकारी आणि पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. त्यामुळे मार्च महिना संपतानाच या बदल्या होणार हे निश्चित होते. त्यानुसार चार दिवसांपूर्वी (28 मार्च) काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर आज (31 मार्च) मुख्यमंत्री कार्यालयापासून मुंबई महापालिका आयुक्तपदापर्यंतच्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.

सध्या कृषी व पशुसंवर्धन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असलेले विकास चंद्र रस्तोगी यांची वित्त विभागात अतिरिक्त मुख्य सचिव (आर्थिक सुधार) म्हणून बदली केली आहे. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभागात प्रधान सचिव म्हणून कार्यरत असलेल्या विनिता वेद सिंगल यांची मृदा व जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प येथे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत असलेल्या परिमल सिंह यांची कृषी विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचीही बदली करण्यात आली आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव असलेल्या मुंढे यांची आता आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल आणि वन या विभागाच्या सचिवपदी बदली झाली आहे.

शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेड, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून लहू माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या जागी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून माणिक गुरसाळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य कर विभागात मुंबई येथे संयुक्त आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या प्रेरणा देशभ्रतार यांची मत्स्यव्यवसाय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या पृथ्वीराज बी. पी. यांची वसई-विरार महानगरपालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

Transfer order dated 31.03.2026

1. Shri. Lokesh Chandra (IAS:RR:1993) Chairman & M.D., Maharashtra State Electricity Distribution Co.Ltd. has been posted as Additional Chief Secretary to Chief Minister, Mumbai.

2. Smt. Ashwini Bhide (IAS:RR:1995) Additional Chief Secretary to Chief Minister has been posted Municipal Commissioner, Municipal Corporation of Greater Mumbai, Mumbai.

3. Shri Vikas Chandra Rastogi (IAS:RR:1995) Additional Chief Secretary (Agriculture). Agriculture and ADF Department, Mantralaya, Mumbai has been posted as Additional Chief Secretary (Financial Reforms), Finance Department, Mantralaya, Mumbai.

4. Smt.Vinita Vaid Singal (IAS:RR:1996) Principal Secretary, Disaster Management, R&R, Revenue & Forest Department, Mantralaya, Mumbai has been posted as Principal Secretary. Soil and Water Conservation Department, Mantralaya, Mumbai.

5. Shri Parimal Singh (IAS:RR:2004) Project Director, Nanaji Deshmukh krishi Sanjivanee Project (POCRA), Mumbai has been posted as Secretary (Agriculture). Agriculture and ADF Department, Mantralaya, Mumbai.

6. Shri Tukaram Mundhe (IAS:RR:2005) Secretary, Divyang Kalyan Department, Mantralaya, Mumbai has been posted Secretary, Disaster Management, R&R, Revenue & Forest Department, Mantralaya, Mumbai.

7. Shri. Lahu Mali (IAS:SCS:2009) has been posted as Managing Director, Shivshahi Punarvasan Project Ltd Mumbai.

8. Shri Manik Gursal (IAS:SCS:2009) has been posted Secretary, Divyang Kalyan Department, Mantralaya, Mumbai.

9. Smt.Prerna Deshbhratar (IAS:RR:2010) Joint Commissioner, State Tax, Mumbai has been posted as Commissioner, Fisheries,Mumbai.

10. Shri Prithviraj B P (IAS:RR:2014) Additional Municipal Commissioner, Pune Municipal Corporation,Pune has been posted as Municipal Commissioner, Vasai Virar Municipal Corporation, Virar.

SCROLL FOR NEXT