Maharashtra government has sanctioned four Toyota Innova Hycross vehicles worth ₹1.32 crore for Lokayukta members amid the state’s drought situation. Sarkarnama
प्रशासन

Fadnavis government news : दुष्काळात फडणवीस सरकारने माजी अधिकाऱ्यांसाठी तिजोरी उघडली; रश्मी शुक्ला, गुप्तांसह चौघांना 4 आलिशान कार

Rashmi Shukla, Om Prakash Gupta, Lokayukta luxury cars : मंत्री उदय सामंत यांनी सत्कार स्वीकारण्यास बंदी घालण्याच्या सूचना नुकत्याच अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शेतकऱ्यांना कमी खर्चाचे आवाहन केले आहे.

Rajanand More

Maharashtra Lokayukta news : पावसाने दडी मारल्याने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळामुळे सरकारी पैशांचा अपव्यय टाळण्याचे आवाहन सरकारमधील मंत्री करत आहेत. मात्र, सरकारनेच लोकायुक्त कार्यालयातील चार सदस्यांना आलिशान गाड्या खरेदी करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. प्रत्येक गाडीवर ३३ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.

राज्य सरकारकडून या वाहनांच्या खरेदीसाठी निधी मंजूर केल्याचा जीआर सोमवारी काढण्यात आला आहे. माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे हे लोकायुक्त असून माजी न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे व सुवर्णा केवले हे दोन न्यायिक सदस्य आहेत. तर राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि माजी सनदी अधिकारी ओम प्रकाश गुप्ता हे दोन न्यायिक सदस्यांव्यतिरिक्त अन्य सदस्य आहेत.

काही दिवसांपूर्वीच सदस्यांचा शपथविधी पार पडला आहे. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने लोकायुक्त कार्यालयासाठीच्या वाहनांचा सुधारित आढावा ४ सप्टेंबर रोजी जाहीर केला होता. त्यानुसार सदस्यांनाही वाहने मंजूर करण्यात आली होती. त्याचदिवशी वाहन खरेदीला प्रशासकीय मान्यता देणारा जीआरही काढण्यात आला होता.

सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी काढलेल्या जीआरनुसार निधीला मंजुरी दिली आहे. सदस्यांसाठीच्या चार वाहनांसाठी एकूण १ कोटी ३२ लाख १८ हजार ७६८ रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक वाहनावर ३३ लाख ४ हजार ६९२ रुपये निश्चित करण्यात आले आहेत. Innova-Hycross (ZX-7S) हे वाहन खरेदी करण्याबाबत जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, राज्याला दुष्काळाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. पहिल्या टप्प्यात २६५ तालुक्य दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये आणखी वाढ होण्याची भीती आहे. यापार्श्वभूमीवर राज्यातील मंत्री खर्च कमी करण्याचे आवाहन करत आहेत.

मंत्री उदय सामंत यांनी सत्कार स्वीकारण्यास बंदी घालण्याच्या सूचना नुकत्याच अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एवढेच नाही तर काजू, बदाम, पिस्ते कायमस्वरूपी बंद करण्याचे, जिल्हा नियोजनच्या बैठकीत साधे जेवण देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना साधेपणाने लग्न उरकण्याचा सल्ला दिला आहे. एकीकडे खर्च कमी करण्यासाठी आवाहन केले जात असतानाच सरकारने तब्बल ३३ लाख रुपये किंमतीच्या चार वाहनांच्या खर्चाला मंजूरी दिल्याने सामान्य प्रशासन विभागाचा सोमवारचा जीआर चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT