Mumbai News: मुंबई कारागृह पोलिस विभागांतर्गत पोलिस शिपाई पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 717 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया याबाबतची माहिती, मैदानी चाचणी कशी होणार (ग्राउंड) याबाबत जाणून घेऊया
पदाचे नाव – पोलिस शिपाई
पद संख्या – 717 जागा
शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण – मुंबई
12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत)
खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
खुला प्रवर्ग: रु. 450 /-
मागास प्रवर्ग: रु. 350 /-
अर्ज सुरू होण्याची तारीख – ५ मार्च २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२४
अधिकृत वेबसाइट – mahaprisons.gov.in
ऑनलाइन अप्लिकेशन फॉर्म : policerecruitment2024.mahait.org
PDF जाहिरात : पोलिस शिपाई
https://shorturl.at/efvw2
अधिक माहितीसाठी http://mahaprisons.gov.in/Site/Home/Index.aspx
उमेदवारांची लेखी परीक्षा मराठी भाषेत घेतली जाणार आहे.
ही लेखी परीक्षा 100 गुणांची असेल
त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.
विषय गुण (कंसात)
अंकगणित (20 गुण)
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी (20 गुण)
बुद्धिमत्ता चाचणी (20 गुण)
मराठी व्याकरण (20 गुण)
मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम (20 गुण)
एकूण गुण : 100 गुण
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.